शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

पालघर साधू हत्याकांडांतील आरोपांमुळे काशिनाथ चौधरी यांना अश्रू अनावर; "माझं राजकीय करियर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 13:10 IST

या घटनेशी संबंधित कुठल्याही तपास यंत्रणेसमोर मी पुन्हा नव्याने जायला तयार आहे. परंतु या घटनेशी माझा थेट संबंध जोडू नका असं आवाहन काशिनाथ चौधरी यांनी केले आहे.

डहाणू - पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर भाजपाने आरोप केले होते, ते काशिनाथ चौधरी यांनी २ दिवसांपूर्वी भाजपात पक्षप्रवेश केला. चौधरी यांच्या पक्ष प्रवेशानंतर पालघर साधू हत्याकांड पुन्हा चर्चेत आले. या घटनेवरून विरोधकांसह हिंदुत्ववादी संघटनांकडूनही भाजपाला टार्गेट करण्यात आले. त्यानंतर भाजपाने यू टर्न घेत २४ तासांत काशिनाथ चौधरी यांच्या पक्ष प्रवेशाला स्थगिती दिली. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पालघर जिल्हाध्यक्षांना पत्र पाठवून चौधरी यांच्या पक्ष प्रवेशाला स्थगिती देत असल्याचं कळवले आहे. मात्र या घटनेवरून काशिनाथ चौधरी यांनी त्यांची बाजू पत्रकारांसमोर मांडली. त्यावेळी चौधरी यांना अश्रू अनावर झाले.

काशिनाथ चौधरी म्हणाले की, २ दिवसांपूर्वी मी भाजपात प्रवेश केला, त्यानंतर ५ वर्षापूर्वी घडलेल्या गडचिंचले येथील साधू हत्याकांडांचे प्रकरण उकरून काढले गेले. ज्यावेळी ती घटना घडली तेव्हा पोलिसांसोबत मदतीला मी तिथे गेलो होतो. मात्र या घटनेशी माझा थेट आरोपी म्हणून संबंध जोडला जातो. या घटनेशी माझा कुठेही संबंध नाही. या संपूर्ण प्रकरणाचा तपास झाला आहे. आरोपपत्र दाखल झाले आहे. त्यात कुठेही माझे आरोपी म्हणून नाव नाही. एवढे असताना माझ्यावर या घटनेचा आरोपी म्हणून आरोप होतायेत हे माझ्यासाठी अतिशय वेदनादायी आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच माझ्यापेक्षा माझ्या कुटुंबाला याच्या वेदना सहन कराव्या लागत आहेत. माझी २ मुले आहेत. माझ्या मुलाला त्याच्या हॉस्टेलमध्ये तुझा बाप गुन्हेगार आहे, खूनी आहे असं बोलले जाते. त्याच्याशी कुणी बोलायला तयार नाही. आज त्याचा पेपर आहे तो पेपरलाही जायच्या मानसिकतेत नाही. आम्ही गरीब कुटुंबातील आहोत. संघर्षातून तयार झालेला कार्यकर्ता आहे. मी माझ्या कुटुंबातला पहिला राजकारणी आहे. माझ्या कुटुंबातील कुणीही साधी ग्रामपंचायत लढली नाही. तळागाळात कार्यकर्त्यांसोबत काम करतोय. माझं राजकीय करियर उध्वस्त झालं तरी चालेल परंतु यामध्ये माझे कुटुंब, माझी मुलं भरडली  जात आहेत ते थांबवावे. माझ्यावर हे आरोप होतायेत त्यामुळे मी व्यथित आहे, माझे कुटुंब व्यथित आहे असं सांगताना काशिनाथ चौधरी यांना अश्रू अनावर झाले.

दरम्यान, या घटनेशी संबंधित कुठल्याही तपास यंत्रणेसमोर मी पुन्हा नव्याने जायला तयार आहे. परंतु या घटनेशी माझा थेट संबंध जोडू नका. माझं अजून भाजपाच्या वरिष्ठांशी बोलणं झाले नाही. मी कुणाशीही बोललो नाही. मी माझ्या कुटुंबासोबत आहे. ज्या घटनेचा मी साक्षीदार आहेत, निष्पाप साधूंना वाचवण्यासाठी मी पोलिसांसोबत तिथे गेलो. परंतु मला त्यात आरोपी बनवण्याचं काम सोशल मीडियातून केले गेले. त्याबाबत मी खुलासा करण्यासाठी माध्यमांसमोर आलो. या देशातील कुठल्याही चौकशी यंत्रणेला सामोरे जायला मी तयार आहे असं आवाहनही काशिनाथ चौधरी यांनी केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Palghar Sadhus Case: Kashinath Choudhary weeps over accusations, career threatened.

Web Summary : Accused in Palghar Sadhus case, Kashinath Choudhary, broke down after BJP suspended his entry amidst controversy. He denies involvement, citing police investigation and family suffering from accusations. He welcomes further investigation.
टॅग्स :BJPभाजपाpalgharपालघर