शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

बु-हान वनीच्या खात्म्यानंतर दहशतवादी संघटनेत तरुणांची भरती

By admin | Updated: March 22, 2017 14:02 IST

जम्मू-काश्मीरमध्ये 2016 मध्ये कमीत-कमी 88 तरुणांनी दहशतवादाचा मार्ग पत्करला आहे. येथील 2010 नंतर दहशतवादी संघटनेत सामील होण्याचा तरुणांचा हा सर्वात मोठाआकडा आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - जम्मू-काश्मीरमध्ये 2016 मध्ये कमीत-कमी 88 तरुणांनी दहशतवादाचा मार्ग पत्करला आहे. येथील 2010 नंतर दहशतवादी संघटनेत सामील होण्याचा तरुणांचा हा सर्वात मोठाआकडा आहे. याबाबतची माहिती मंगळवारी लोकसभेत देण्यात आली. हिजबूल मुजाहिद्दीन या संघटनेचा कमांडर बु-हान वनी याचा चकमकीत मृत्यू झाल्यानंतर काश्मीरच्या घाटीमध्ये हिंसक निदर्शने झाली होती. यावेळी फक्त जुलै ते सप्टेंबर 2016 मध्ये दंगलीच्या 2100 हून अधिक घटना घडल्या होत्या. 
गेल्या वर्षी म्हणजेच 2016 मध्ये 88 काश्मीरी तरुण दशहतवादी संघटनेत सामील झाल्याचे समोर आल्यामुळे येथील परिस्थितीत मोठा बदल होताना दिसत आहे. 2014 मध्ये दहशतवादाचा मार्ग कमी प्रमाणात तरुणांनी स्वीकारल्याचे दिसून आले होते. मात्र, गेल्या 2016 पासून घाटीमध्ये दगडफेकीच्या घटना वाढल्या. त्यानंतर त्याठिकाणी अशांतता पसरली. तसेच, दहशतवादी संघटनामधून अनेक तरुण भरती झाल्याचे उघड झाले.
दरम्यान, लोकसभेत केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिलेल्या माहितीनुसार, काश्मीरमध्ये 2015 मध्ये 66, 2014 मध्ये 53, 2013 मध्ये 16, 2012 मध्ये 21, 2011 मध्ये 23 आणि 2010 मध्ये 54 तरुणांनी दहशतवादाचा मार्ग स्वीकाराला आहे. या तरुणांना दहशतवादापासून रोखण्याचा प्रयत्न सार्वजनिक स्तरावर पोलीस करत आहेत. वेगवेगळ्या खेळांचे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन या ठिकाणी करण्यात येत आहे. याचबरोबर  उड्डाण आणि हिमायत सारख्या कार्यक्रमांद्वारे तरुणांना नोकरी आणि रोजगाराचे मार्गही उपलब्ध करून देण्यात येत आहेत, असे हंसराज अहीर यांनी सांगितले.