'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 10:06 IST2025-07-02T10:05:54+5:302025-07-02T10:06:25+5:30
अशाप्रकारे आता किती महिलांना या दहशतवादी लोकांनी प्रशिक्षित केले आहे, त्या कुठे कुठे हे काम करत आहेत, याचा शोध घेण्याचे आव्हान केरळ पोलिसांवर आहे.

'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याचे, दहशतवादी तयार करण्यासाठी सीमेवरील किंवा उत्तर प्रदेशमधील मुस्लिम लोकांना आमिष दाखविले जायचे. त्यांचा ब्रेनवॉश केला जायचा आणि भारताविरोधात हल्ले, स्फोट घडवून आणले जायचे. हे जिहादी दहशतवादी लोक आता केरळमध्ये जाऊन पोहोचले आहेत. मुलींचे धर्मांतरण करून त्यांना जिहादी प्रशिक्षण दिले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
पोलिसांनी एका तरुणीची सुटका केली आहे. तिच्या चौकशीत देशविघातक कृत्य समोर आले आहे. ही तरुणी ट्रेनने केरलला पोहोचली होती. दरकशा नावाची महिला या तरुणींना घेऊन आली होती, तिने केरमधील रेल्वेस्टेशनवर आल्यावर कोणाला तरी फोन केला होता, तिथे त्यांना कार न्यायला आली आणि त्रिशूरच्या एका हॉस्टेलवर घेऊन गेली. आराम केल्यावर दुसऱ्याच दिवशी या तरुणींना हिजाब घालण्यास शिकविण्यात आले. काही दिवसांनी तिचे धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर तरुणींना जिहादी बनविण्यासाठी प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली.
यातील एक तरुणी घाबरली आणि संधी मिळताच रेल्वे स्थानकावर आली. तिच्या मागोमाग दरकशा देखील आली आणि वाद घालू लागली. टीटीईने प्रसंगावधान राखून पोलिसांच्या ताब्यात दिले आणि सगळा भांडाफोड झाला. या पीडित तरुणीला प्रयागराजहून दिल्लीला नेण्यात आले होते. या प्रवासात दरकशा सारखी फोन करून कुठे पोहोचलीआह याची माहिती घेत होती. दिल्लीतून तिला केरळला नेण्यात आले.
दरकशाची चौकशी केल्यावर ताज नावाच्या व्यक्तीने तरुणींची गरज असल्याचे सांगून चांगले कमिशन मिळेल असे सांगितले होते, असे कबुल केले आहे. फुलपूरच्या जोगिया शेखपूरमध्ये ती राहते. ताज हा तिच्या बहिणीचा दीर आहे आणि केरळमध्ये नोकरी करतो. नोकरीसाठी तरुणींची गरज असल्याचे ताजनेची तिला सांगितले होते. यामुळे एका तरुणीच्या आईला पैसे देऊन दरकशाने तिला नेले होते. या पीडितेला दरकशा आणि मोहम्मद कैफ नावाच्या तरुणाने प्रयागराजला नेले. वाटेत तिच्यावर अत्याचारही करण्यात आले होते. इथून या तरुणीला जिहादी बनविण्याचा कट सुरु झाला होता. केरळमध्ये गेल्यावर काही अज्ञात व्यक्तींना तिला भेटविण्यात आले. तिला पैशांचे लालच दाखवून धर्मपरिवर्तन करण्यात आले व पुढे जिहादी प्रशिक्षण देण्यात येत होते. अशाप्रकारे आता किती महिलांना या दहशतवादी लोकांनी प्रशिक्षित केले आहे, त्या कुठे कुठे हे काम करत आहेत, याचा शोध घेण्याचे आव्हान केरळ पोलिसांवर आहे.