शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 12:05 IST

गर्लफ्रेंड भेटायला आली नाही म्हणून बॉयफ्रेंड चिडला आणि थेट टॉवरवर चढला.

उत्तर प्रदेशमध्ये एक अजब घटना पाहायला मिळाली आहे. गर्लफ्रेंड भेटायला आली नाही म्हणून बॉयफ्रेंड चिडला आणि थेट टॉवरवर चढला. हे दृश्य पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी जमली आणि काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, आकाश असं या तरुणाचं आहे, जो हरदोईचा रहिवासी आहे. 

आकाश त्याच्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी आला होता. मात्र मुलीच्या कुटुंबाने त्याला भेटू दिलं नाही. त्यामुळे संतापलेला आकाश एका उंच टॉवरवर चढला. त्याने खाली येण्यास स्पष्ट नकार दिला आणि त्याच्या गर्लफ्रेंडला बोलावण्याची मागणी करत राहिला. आकाशच्या या कृतीमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. हे दृश्य पाहण्यासाठी लोक जमले. लवकरच मोठी गर्दी जमली. 

पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचलं आणि आकाशला समजावण्याचा प्रयत्न करू लागले. परंतु आकाश ठाम राहिला आणि त्याने वारंवार आपल्या गर्लफ्रेंडशीच लग्न करायचं आहे, तिला भेटायचं आहे असा आग्रह धरला. मुलीच्या कुटुंबीयांचा या नात्याला विरोध आहे. म्हणून ते दोघांना भेटू देत नाहीत. 

पोलीस आकाशशी बोलले, त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि खूप प्रयत्नांनंतर अखेर त्याला खाली आणलं. या घटनेचे अनेक व्हिडीओ आणि फोटो जोरदार व्हायरल होत आहे. तसेच सोशल मीडियावरही याचीच चर्चा रंगली आहे. लोक यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक याला वेडेपणा आणि मूर्खपणा म्हणत आहेत. 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलUttar Pradeshउत्तर प्रदेशViral Videoव्हायरल व्हिडिओ