शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

वेटिंग लिस्टचे तिकीट कन्फर्म झाले का, हे आता २४ तास आधीच कळणार! शेवटच्या क्षणापर्यंतची प्रतीक्षा संपणार; सध्या ४ तास आधी येतो चार्ट; लाखो प्रवाशांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 09:12 IST

Indian Railway: भारतीय रेल्वेने वेटिंग लिस्टवरील प्रवाशांसाठी नवे नियम लागू केले आहेत. आता प्रवाशांना त्यांचे तिकीट कन्फर्म झाले आहे की नाही, याची माहिती ट्रेन सुटण्याच्या २४ तास आधीच मिळणार आहे.

नवी दिल्ली - भारतीय रेल्वेने वेटिंग लिस्टवरील प्रवाशांसाठी नवे नियम लागू केले आहेत. आता प्रवाशांना त्यांचे तिकीट कन्फर्म झाले आहे की नाही, याची माहिती ट्रेन सुटण्याच्या २४ तास आधीच मिळणार आहे. यापूर्वी फक्त ४ तास आधी आरक्षण चार्ट तयार केला जात असे, त्यामुळे वेटिंग तिकिटधारकांना शेवटच्या क्षणापर्यंत प्रतीक्षा करावी लागत असे. नवीन निर्णयाचा लाखो रेल्वे प्रवाशांना फायदा होणार आहे.

हा नवा नियम लवकरच देशभर लागू केला जाणार आहे. तत्काळ तिकिट बुकिंगच्या नियमांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तत्काळ तिकिटे पूर्वीप्रमाणे प्रवासाच्या एक दिवस आधीच बुक करता येतील व त्यांची कन्फर्मेशन प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच राहणार आहे.

वेटिंग लिस्टवरील प्रवाशांसाठी आले कठोर नियम रेल्वेने वेटिंग लिस्टवरील प्रवाशांसाठी काही कठोर नियम लागू केले आहेत. वेटिंग लिस्टवर असलेल्या प्रवाशांना एसी किंवा स्लीपर कोचमध्ये प्रवास करता येणार नाही. अशा प्रवाशांनी फक्त जनरल कोचमधूनच प्रवास करता येईल. जर कोणी वेटिंग तिकीट घेऊन एसी किंवा स्लीपर कोचमध्ये प्रवास करताना सापडले तर त्याला दंड आकारण्यात येईल. ...तर दंड रक्कम किती?४४० एसी कोच २५०स्लीपर कोचयाशिवाय, प्रवाशाने ज्या स्टेशनपासून प्रवास केला आणि ज्या स्टेशनवर पकडले गेले, त्या दरम्यानचा पूर्ण प्रवास भाडेही भरावे लागेल.

तिकिटास दोन श्रेणीपर्यंतच अपग्रेड करता येणारआता स्लीपर क्लासच्या तिकिटाला फक्त दोन श्रेणीपर्यंतच अपग्रेड करता येईल. स्लीपर क्लासचे तिकीट जास्तीत जास्त थर्ड एसी किंवा सेकंड एसीपर्यंतच अपग्रेड करता येईल, फर्स्ट एसीपर्यंत नाही. त्याचप्रमाणे, थर्ड एसीचे तिकीट जास्तीत जास्त फर्स्ट एसीमध्येच अपग्रेड करता येईल.

वेटिंग लिस्टसाठी काय?२१ मे रोजी भारतीय रेल्वेने वेटिंग लिस्ट तिकिटांसंदर्भातील ‘ऑटो अपग्रेड’ प्रक्रियेत महत्त्वाचा बदल केला आहे. आयआरसीटीच्या नव्या नियमानुसार, आता ‘फर्स्ट एसी’च्य कोचमध्ये जागा रिकामी असली, तरी स्लीपर क्लासमधील तिकीट ‘फर्स्ट एसी’मध्ये अपग्रेड केले जाणार नाही.

 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे