शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
4
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
5
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
6
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
7
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
8
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
9
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
10
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
11
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
12
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
13
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
14
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
15
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
16
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
17
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
18
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
Daily Top 2Weekly Top 5

"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 22:46 IST

यावेळी पात्रा यांनी ईव्हीएमचा नवा अर्थही सांगितला, ते म्हणाले, "ईव्हीएमचा अर्थ, 'ई'पासून ऊर्जा, 'व्ही'पासून विकास आणि 'एम'पासून मेहनत. यामुळेच भारजपचा विजय होतो. काँग्रेसने आपल्या पराभवासाठी ‘आरबीएम’ला (राहुल यांचे बेकार मॅनेजमेंट) जबाबदार ठरवायला हवे." 

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी बुधवारी काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढवला. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) काढून बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेण्याच्या काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मागणीला प्रत्युत्तर देताना पात्रा यांनी काँग्रेसने मंगळावर जाऊन निवडणूक लढवावी, असा टोला लगावला आहे. एवढेच नाही तर, खर्गे यांचे वक्तव्य हास्यास्पद आणि जनतेच्या निर्णयाचा अपमान असल्याचे पात्रा यांनी म्हटले आहे.

संबित पात्रा यांचा पलटवार -मल्लिकार्जुन खर्ग यांनी ईव्हीएमसंदर्भात बोलताना नुकतेच म्हटले होते की, "यामुळे ओबीसी, एससी, एसटी आणि दुर्बल घटकांतील लोक जी मते टाकत आहेत ती वाया जात आहेत. आमचे म्हणणे आहे की, सर्व सोडा आणि बॅलेट पेपरद्वारे मतदान करा." यावर पलटवार करत संबित पात्रा म्हणाले, "या वर्गाला ईव्हीएम कसे वापरायचे हे कळत नाही, असे काँग्रेस मानते का? हा विचार त्यांचा अपमान करणारा आहे." याचवेळी खर्गे यांचा हा तर्क फेटाळून लावत, ही काँग्रेसची निराशा असल्याचेही पात्रा म्हणाले.

"मंगळावर जाऊन निवडणूक लढा" -पुढे बोलताना बोचरा हल्ला करत संबित पात्रा म्हणाले, ""खर्गे जी म्हणतात की, त्यांना ईव्हीएम, ईडी, सीबीआय आणि भारत सरकार नको आहे. असे असेल तर त्यांच्यासाठी सर्वात चांगले ठीकाण मंगळ ग्रह आहे. तेथे ना ईव्हीएम आहे ना निवडणूक आयोग. तेथे तुमच्या राजकुमाराला (राहुल गांधी) खुर्चीवर बसवा." 

पात्रांनी सांगितला ईव्हीएमचा नवा अर्थ - यावेळी पात्रा यांनी ईव्हीएमचा नवा अर्थही सांगितला, ते म्हणाले, "ईव्हीएमचा अर्थ, 'ई'पासून ऊर्जा, 'व्ही'पासून विकास आणि 'एम'पासून मेहनत. यामुळेच भारजपचा विजय होतो. काँग्रेसने आपल्या पराभवासाठी ‘आरबीएम’ला (राहुल यांचे बेकार मॅनेजमेंट) जबाबदार ठरवायला हवे." 

टॅग्स :Sambit Patraसंबित पात्राBJPभाजपाEVM Machineईव्हीएम मशीनcongressकाँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे