शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

योगी आदित्यनाथ मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

By admin | Updated: March 22, 2017 18:13 IST

उत्तर प्रदेशमधल्या योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातील खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 22 - उत्तर प्रदेशमधल्या योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातील खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री असलेल्या केशव प्रसाद मौर्य यांच्याकडे लोककल्याण विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग ही खाती सोपवण्यात आली आहेत. तर मोहसीन रजा अल्पसंख्याक मंत्री, स्वाती सिंग यांच्याकडे महिला आणि बालकल्याण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. चेतन चौहान यांची क्रीडामंत्रिपदी, तर दिनेश शर्मा यांची उच्च शिक्षण मंत्रालयपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सूर्य प्रताप शाही यांच्याकडे कृषी मंत्रालय, तर स्वामी प्रसाद मौर्य यांच्याकडे सहकार मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. योगी आदित्यनाथ यांनी गृह आणि जनसंपर्क मंत्रालय स्वतःकडेच ठेवलं आहे. तसेच, रिटा बहुगुणा-जोशी यांच्याकडे बालकल्याण मंत्रालयाची जबाबदारी सोपविली आहे. श्रीकांत शर्मा यांच्याकडे ऊर्जा आणि  राजेश अगरवाल यांच्याकडे वित्तमंत्रालयाची जबाबदारी दिली आहे. उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत कमालीचे यश मिळविल्यावर भारतातील सर्वात मोठ्या राज्याच्या 21व्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ यांची निवड भाजपाकडून एकमताने करण्यात आली होती. प्रदेशाध्यक्ष केशवप्रसाद मौर्य आणि लखनौचे महापौर दिनेश शर्मा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. लखनऊमधील काशीराम मेमोरिअल मैदानावर आदित्यनाथ यांच्यासोबत जवळपास 43 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. राज्यपाल राम नाईक यांनी योगी आदित्यनाथ यांना पद आणि गोपनीयेतची शपथ दिली होती. एनडीएची सत्ता असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्रीही या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिले होते.