शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लढ्यात योग उपयुक्त; प्राणायामाने प्रतिकारशक्ती वाढते- मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 03:10 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात योगाच्या उपयुक्ततेवर भर दिला.

नवी दिल्ली : सध्याच्या महामारीविरुद्ध लढताना योगाची आपल्याला मदत होत आहे. प्राणायामामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते व श्वसनाचे विकार दूर होतात, असे प्रतिपादन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात योगाच्या उपयुक्ततेवर भर दिला.सन २०१५ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन जाहीर केल्यापासून प्रथमच याचे कार्यक्रम व्हर्च्युअल पद्धतीने झाले. हा दिवस आपल्याला विश्वबंधुत्वाची शिकवण देतो, असे सांगून मोदी म्हणाले की, योगामुळे मानसिक शांती मिळते व आचार-विचारात सकारात्मकता येते. आपण आरोग्य व अपेक्षांची तार जुळविली, तर समग्र मानवी समाज आरोग्यसंपन्न व आनंदी होण्याचा दिवस फार दूर नाही. योगामुळे हे नक्कीच घडू शकते.सध्याच्या संकटात जगाला योगाची निकड अधिक गांभीर्याने होत असल्याचे सांगून पंतप्रधान म्हणाले की, रोगप्रतिकारशक्ती बळकट असेल, तर आपण रोगांवर मात करू शकतो. योगासनांमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्याखेरीज शरीर बळकट होऊन चयापचय क्रियाही सुधारते. ‘कोविड-१९’ चा आजार मुख्यत: श्वसनयंत्रणेवर आघात करीत असल्याने अशा वेळी आपल्याला प्राणायामाचा खूप उपयोग होऊ शकतो.पंतप्रधान म्हणाले की, योगामुळे ऐक्यभावना वाढीस लागते व मानवतेचे बंध मजबूत होतात. योग वंश, वर्ण, लिंग, धर्म अथवा देश यात कोणताही भेदभाव करीत नाही. कोणीही योग आत्मसात करू शकतो. त्यासाठी लागतो फक्त थोडा वेळ व थोडी मोकळी जागा.संकटाच्या काळातही मन स्थिर ठेवून संकटास धैर्याने सामोरे जाण्याचे मनोबल योगामुळे आपल्याला प्राप्त होते. मन निग्रही पण संयमी बनते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीInternational Yoga Dayआंतरराष्ट्रीय योग दिन