जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट; पाकिस्तानची बिकट अवस्था, भारत कितव्या स्थानावर? पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 03:39 PM2024-01-11T15:39:37+5:302024-01-11T15:39:37+5:30

World Most Powerful Passport: जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टची यादी समोर आली आहे.

World Most Powerful Passport: Pakistan's dire situation, how far is India? Find out... | जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट; पाकिस्तानची बिकट अवस्था, भारत कितव्या स्थानावर? पाहा...

जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट; पाकिस्तानची बिकट अवस्था, भारत कितव्या स्थानावर? पाहा...

World Most Powerful Passport: कुठल्याही देशात फिरायला जाण्यासाठी प्रत्येकाला पासपोर्ट आणि व्हिसाची गरज असते. पण, काही देशांचे पासपोर्ट इतके पॉवरफुल आहेत की, त्यांना व्हिसाची गरज नाही. नुकतीच जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टची नवी यादी जाहीर करण्यात आली आहे. जाणून घेऊन जगातील टॉप पासपोर्टची यादी. 

या यादीत भारत तब्बल 80व्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे, पहिल्या क्रमांकावर एकूण 6 देश आहेत. या सर्व 6 देशांतील नागरिक व्हिसाशिवाय 194 देशात जाऊ शकतात. यंदाही पाकिस्तानचे पहिल्या 100 मध्ये नाव नाही. हेन्ले पासपोर्ट इंडेक्सच्या 2024 च्या क्रमवारीनुसार, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, सिंगापूर आणि स्पेन पहिल्या स्थानावर आहेत. फिनलंड, दक्षिण कोरिया आणि स्वीडन दुसऱ्या स्थानावर, तर ऑस्ट्रिया, डेन्मार्क, आयर्लंड आणि नेदरलँड तिसर्‍या स्थानावर आहेत. दुसऱ्या क्रमांकावरील देशांच्या नागरिकांना एकूण 193 ठिकाणी व्हिसा फ्री एंट्री मिळू शकते.

भारत 80 व्या क्रमांकावर 
शक्तिशाली पासपोर्ट असलेल्या देशांच्या यादीत भारत 80 व्या क्रमांकावर आहे. भारतातील लोक व्हिसाशिवाय 62 देशांमध्ये जाऊ शकतात. गेल्या वर्षी भारत 83व्या स्थानावर होता. यावेळी भारतासोबत उझबेकिस्तानही 80 व्या क्रमांकावर आहे. या यादीत चीन आणि पापुआ न्यू गिनी यांना 62वे स्थान मिळाले आहे. या यादीत अफगाणिस्तान शेवटच्या स्थानावर आहे.

पाकिस्तानची परिस्थिती अत्यंत वाईट 
बेल्जियम, लक्झेंबर्ग, नॉर्वे, पोर्तुगाल आणि ब्रिटन चौथ्या स्थानावर असून, ग्रीस, माल्टा आणि स्वित्झर्लंड पाचव्या स्थानावर आहेत. सर्वात कमकुवत पासपोर्ट असलेल्या देशाबद्दल बोलायचे झाले तर पाकिस्तान चौथ्या क्रमांकावर आहे. येमेन, नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंकादेखील पाकिस्तानच्या पुढे आहे.

जगातील 10 सर्वात शक्तिशाली पासपोर्ट:-

  1. फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, सिंगापूर, स्पेन (स्कोअर: 194)
  2. फिनलंड, दक्षिण कोरिया, स्वीडन (स्कोअर: 193)
  3. ऑस्ट्रिया, डेन्मार्क, आयर्लंड, नेदरलँड्स (स्कोअर: 192)
  4. बेल्जियम, लक्झेंबर्ग, नॉर्वे, पोर्तुगाल, युनायटेड किंगडम (स्कोअर: 191)
  5. ग्रीस, माल्टा, स्वित्झर्लंड (स्कोअर: 190)
  6. ऑस्ट्रेलिया, झेकिया, न्यूझीलंड, पोलंड (स्कोअर: 189)
  7. कॅनडा, हंगेरी, युनायटेड स्टेट्स (स्कोअर: 188)
  8. एस्टोनिया, लिथुआनिया (स्कोअर: 187)
  9. लाटविया, स्लोव्हाकिया, स्लोव्हेनिया (स्कोअर: 186)
  10. आइसलँड (स्कोर: 1)185

जगातील 10 सर्वात कमकुवत पासपोर्ट:

  1. इराण, लेबनॉन, नायजेरिया, सुदान (स्कोअर: 45)
  2. इरिट्रिया, श्रीलंका (स्कोअर: 43)
  3. बांगलादेश, उत्तर कोरिया (स्कोअर: 42)
  4. लिबिया, नेपाळ, पॅलेस्टिनी प्रदेश (स्कोअर: 40)
  5. सोमालिया (स्कोर: 36)
  6. येमेन (स्कोर: 35)
  7. पाकिस्तान ((स्कोर: 34)
  8. इराक (स्कोअर: 31)
  9. सीरिया (स्कोअर: 29)
  10. अफगाणिस्तान (स्कोअर: 28)

Web Title: World Most Powerful Passport: Pakistan's dire situation, how far is India? Find out...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.