शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जग महामंदीच्या उंबरठ्यावर; 26 अर्थव्यवस्थांवर कर्जाचा डोंगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2018 11:19 IST

अमेरिकेची सर्वांत जुनी बँक लेहमन ब्रदर्स बुडाली याला नुकतीच दहा वर्षे पूर्ण झाली. 2008 च्या महांदीतून सावरलेल्या अर्थव्यवस्था पुन्हा एकदा मंदीच्या उंबरठ्यावर आहेत.

नवी दिल्ली : अमेरिकेची सर्वांत जुनी बँक लेहमन ब्रदर्स बुडाली याला नुकतीच दहा वर्षे पूर्ण झाली. 2008 च्या महांदीतून सावरलेल्या अर्थव्यवस्था पुन्हा एकदा मंदीच्या उंबरठ्यावर आहेत. याबाबत साशंकत असली तरीही प्रगतीशिल देशआंवरील कर्जाचे आकडे पाहता अर्थतज्ञांनी तशी शक्यता वर्तविली आहे.

2008 मधील मंदीतून बाहेर पडण्यासाठी जगातील विविध केंद्रीय बँकांनी मोठ्या प्रमाणावर नोटा छापल्या. या नोटा बाजारातही आल्या. जवळपास 290 ट्रिलियन डॉलर एवढी भलीमोठी रक्कम (शेअर बाजार, बॉन्डस आणि इतर मालमत्तांमध्ये) बाजारात आलेली आहे. एवढी रक्कम आली तरीही या बँकांनी व्याजदर कमी ठेवले होते. तसेच गुंतवणूकदारांनी जास्त परतावा मिळण्यासाठी कमी दर्जाच्या गुंतवणूकांमध्ये पैसे टाकले. ही एक मोठी जोखीम आहे.

 कर्जाचा डोंगर, तोही डॉलरमध्ये वाढत्या अर्थव्यवस्थांना अमेरिकी डॉलरचा स्वीकार करावाच लागला. अमेरिकी डॉलर ही अघोषित रिझर्व्ह चलन बनले आहे. यामुळे जगभरातील सर्वच अर्थव्यवस्था अमेरिकेवर अवलंबून राहू लागल्या. वाढती आणि विकसनशिल अर्थव्यवस्थांमधून जादा फायदा मिळविण्यासाठी गुंतवणूकदारांनी कमी कमुदतीसाठी बराच पैसा ओतला. यामुळे या अर्थव्यवस्थांमध्ये कर्जाची रक्कम वाढत गेली. 2008 नंतर अशा अर्थव्यवस्थांवरील बाहेरच्या संस्थांचे कर्ज 40 ट्रिलियन डॉलरने वाढले. 2008 मध्ये 26 मोठ्या विकसनशिल अर्थव्यवस्थांचे कर्ज त्यांच्या विकास दराच्या 148 टक्के होते. जे 2017 मध्ये 211 टक्के झाले आहे. 

कोलंबिया विद्यापीठाचे कायदेतज्ज्ञ कॅथरीन यांच्या नुसार 2008 च्या मंदीवेळी नियंत्रण प्रणालीमध्ये काही दोष होते. ही प्रणाली एकसंघ नव्हती, तर ती तुकड्या तुकड्यामध्ये होती. आजही त्यामध्ये काहीही बदल झालेला नाही. यामुळे हेच दोष पुन्हा जगाला महामंदीच्या दिशेने नेत आहेत. 

चांगल्या गुंतवणुकीची कमतरताजगभरात महागाईने डोके वर काढले आहे. मालमत्ता महागड्या असल्याने चांगल्या गुंतवणुकीचीही शक्यता धुसर आहे. म्हणजचे कमी संधी आहेत. यामुळे बाजारात सुधारणात्मक पाऊले उचलण्याची गरज आहे. या अर्थव्यवस्थांची अवस्था एवढी नाजूक आहे की एक छोटीशी घटनाही मोठा परिणाम करू शकते. आणि गेल्या वर्षभरात ब्रेक्झिट आणि अमेरिका-चीनमधले व्यापार युद्ध सुरु झाले आहे. यामुळे मंदी जगाचे दार पुन्हा ठोठावत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयEconomyअर्थव्यवस्था