शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता उखडल्यावर सुरू झाले रेंगाळलेले काम सावंगी- चिकलठाणा : खड्डेमय रस्त्याच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव

By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST

औरंगाबाद : हर्सूल- सावंगी ते चिकलठाणा (केम्ब्रिज) या १३ कि. मी. रस्त्याचे जवळपास साडेपाच कि. मी. चे काम ठेकेदाराने थांबविल्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून रेंगाळले होते. त्यामुळे नव्याने निविदा काढल्यावर अखेर रेंगाळलेल्या कामाची सुरुवात झाली आहे. परंतु पूर्ण झालेल्या ७.५ कि. मी. रस्ता खड्डेमय झाला आहे. त्यामुळे या रस्त्याचे नूतनीकरण करण्याची वेळ येत आहे.

औरंगाबाद : हर्सूल- सावंगी ते चिकलठाणा (केम्ब्रिज) या १३ कि. मी. रस्त्याचे जवळपास साडेपाच कि. मी. चे काम ठेकेदाराने थांबविल्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून रेंगाळले होते. त्यामुळे नव्याने निविदा काढल्यावर अखेर रेंगाळलेल्या कामाची सुरुवात झाली आहे. परंतु पूर्ण झालेल्या ७.५ कि. मी. रस्ता खड्डेमय झाला आहे. त्यामुळे या रस्त्याचे नूतनीकरण करण्याची वेळ येत आहे.
पंधरा लाख लोकसंख्या असलेल्या औरंगाबाद शहराची लाईफ लाईन म्हणून जालना रोड ओळखला जातो. चिकलठाणा ते वाळूज महानगरकडे जाणार्‍या वाहनांची सकाळ, संध्याकाळ गर्दी असते. बीड, जालन्याहून अजिंठा, जळगावकडे ये-जा करणार्‍या वाहनांसाठी शहरातून जाण्यासाठी हा एकमेव रस्ता होता. परंतु १८ सप्टेंबर २००६ मध्ये सावंगी ते चिकलठाणा (केम्ब्रिज) रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन झाले आणि रिंग रोड जोडण्याचा मार्ग मोकळा झाला; परंतु सुरुवातीला काही ठिकाणी भूसंपादन झालेले नसल्याने काम रखडले गेले. त्यानंतर ठेकेदाराने काम थांबविले. त्यामुळे जवळपास साडेपाच कि.मी.चे काम गेल्या अनेक महिन्यांपासून रेंगाळले गेले होते. शिवाय झालेल्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून अवजड वाहनांशिवाय अन्य वाहनधारक प्रवास करण्याचे टाळत आहेत. त्यामुळे हा रस्ता तयार करण्याचा उद्देश पूर्णत्वास जात नसल्याचे गेल्या काही वर्षांपासून दिसून येत आहे.
ठेके दाराने अर्धवट सोडलेले काम पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे नव्याने निविदा मागविण्यात आली. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अखेर रेंगाळलेले हे काम पूर्ण झाले आहे. मे महिन्यापर्यंत हे काम पूर्ण होणार आहे.
खड्डेमय प्रवासाची वेळ
रखडलेले काम मे महिन्यापर्यंत पूर्ण होणार आहे. परंतु त्यापूर्वी तयार झालेल्या रस्त्याची चाळणी झाल्यामुळे वाहनधारकांना खड्डेमय प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वापर करण्याचे धाडस टाळले जाईल. या संपूर्ण रस्त्याचे लवकरात लवकर काम करण्याची मागणी होत आहे.
(जोड आहे)