महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 20:38 IST2025-10-09T20:38:02+5:302025-10-09T20:38:19+5:30
Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील बागपत येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने तिच्या पतीच्या काळ्या कारनाम्यांचं गुपित पोलिसांना सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी सदर महिलेच्या घरी धाव घेत घराची झडती घेतली. या झाडाझडतीवेळी जुना कुलर उघडून पाहिला तेव्हा पोलिसांना धक्काच बसला. या कुलरमध्ये गोळ्या आणि कट्टे सापडले.

महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का
उत्तर प्रदेशमधील बागपत येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने तिच्या पतीच्या काळ्या कारनाम्यांचं गुपित पोलिसांना सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी सदर महिलेच्या घरी धाव घेत घराची झडती घेतली. या झाडाझडतीवेळी जुना कुलर उघडून पाहिला तेव्हा पोलिसांना धक्काच बसला. या कुलरमध्ये गोळ्या आणि कट्टे सापडले.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार ही घटना बागपतमधील जवाहरपूर मेवला गावातील आहे. येथे एका महिलेने डायल ११२ वर फोन करून रडत रडत पोलिसांकडे मदत मागितली. माझा पती मला दररोज मारहाण करतो. तसेच बंदूक दाखवून जिवे मारण्याची धमकी देतो. एवढंच नाती तर त्याने घरात शस्त्रास्त्रांचा साठा करून ठेवला आहे, अशी माहिती या महिलेने दिली.
याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी या महिलेच्या पतीला ताब्यात घेत घराची झडती घेण्यास सुरुवात केली. या झडतीदरम्यान, पोलिसांनी एका कोपऱ्यात ठेवलेला कूलर उघडला तेव्हा त्यांना धक्काच बसला. या कुलरमध्ये पोलिसांनी तीन देशी कट्टे आणि डझनभर काडतुसं सापडली.
त्यानंतरत पोलिसांनी या महिलेचा पती नवीन याला ताब्यात घेत सर्व हत्यारे जप्त केली. आरोपी नवीन याला पोलिसांनी पोलीस ठाण्यात नेले आहे. तिथे पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये नवीन याने दिल्लीतील एका व्यक्तीकडून आपण ही हत्यारे खरेदी केल्याचे सांगितले. नवीन याचा हत्यारांचा पुरवठा करणाऱ्या कुठल्या टोळीशी संबंध नाही ना, याचा तपास पोलीस करत आहेत.