शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

चीनलाही इंगा दाखवा, 'मोस्ट फेवर्ड नेशन'चा दर्जा काढून घ्या; मोदी सरकारवर दबाव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 12:49 PM

मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात अडचणी आणणाऱ्या चीनला आता धडा शिकवावा, असा दबाव मोदी सरकारवर वाढत आहे.

नवी दिल्ली- मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात अडचणी आणणाऱ्या चीनला आता धडा शिकवावा, असा दबाव मोदी सरकारवर वाढत आहे. भारतातल्या नागरिकांनीही चीनविरोधात आक्रमक कारवाईची मागणी केली आहे. याचदरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या स्वदेशी जागरण मंचा(SJM)नं मोदी सरकारकडून चीनला देण्यात आलेला मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा काढून घेण्याची मागणी केली आहे.स्वदेशी जागरण मंचा(SJM)च्या अश्विनी महाजन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रात चीनला भारताकडून देण्यात आलेला  मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा काढण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. चीनहून आयात होणाऱ्या वस्तूंवर भारतात फारच कमी टेरिफ लावला जातो. आता चीनला धडा शिकवण्यासाठी आयात वस्तूंवर भारतानं तात्काळ टॅरिफ वाढवला पाहिजे.महाजन म्हणाले, चीनकडून भारतात 76 अब्ज डॉलर म्हणजेच 5.27 लाख डॉलरच सामान पाठवलं जातं. तर भारताकडून चीनला निर्यात होणाऱ्या वस्तूंची संख्या फार कमी आहे. भारताकडून चीनच्या आयात वस्तूंवर फारच कमी  टॅरिफ आकारला जातो, त्यामुळे भारताला व्यापारात नुकसान होतं. आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित होण्यापासून संयुक्त राष्ट्रात मसूद अजहरला वाचवणाऱ्या चीनवर दबाव वाढत आहे. भारतानंही चीनविरोधात आक्रमक भूमिका घ्यावी, ही जनतेची इच्छा आहे.अनेक संघटनांनी भारतानं चीनविरोधात कडक भूमिका घ्यावी, असं म्हटलं आहे. भारतानं चीनकडून येणाऱ्या मालावरील आयात शुल्क वाढवलं पाहिजे. अमेरिका आणि चीनमध्ये गेल्या अनेक काळापासून तणाव सुरू आहे. अमेरिकेनंही चीनकडून आयात होणाऱ्या वस्तूंवर टॅरिफ शुल्क वाढवलं आहे. चीनला धडा शिकवण्यासाठी भारतानं अमेरिकेसारखं शुल्क चीनकडून आयात होणाऱ्या वस्तूंवर आकारलं पाहिजे. 

टॅग्स :chinaचीनIndiaभारतmasood azharमसूद अजहर