शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
3
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
4
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
5
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
6
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
7
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
8
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
9
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
10
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
11
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
12
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
13
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
14
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
15
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
16
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
17
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
18
एसटी प्रवास महागणार, डिझेल दरवाढीचा प्रवाशांना माेठा फटका
19
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
20
बाजारात ट्रम्प यांचा ‘शेअर खेळ’, तीन महिन्यांत ३,७०० शेअर व्यवहार
Daily Top 2Weekly Top 5

विज्ञान आणि सत्य या मूल्यांच्या सहाय्यानं आपण कोरोनाची लढाई जिंकू शकतो : अझीम प्रेमजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 20:54 IST

Coronavirus : कोरोनाच्या लढाईत विप्रो आणि अझीम प्रेमजी यांनी केली मोठी मदत. त्यांच्याशिवाय टाटा समूह, स्टेट बँक, अदानी, महिंद्रा, सिप्ला, वेदांता यांसारख्या समूहांनीही केली मदत.

ठळक मुद्देकोरोनाच्या लढाईत विप्रो आणि अझीम प्रेमजी यांनी केली मोठी मदत.टाटा समूह, स्टेट बँक, अदानी, महिंद्रा, सिप्ला, वेदांता यांसारख्या समूहांनीही केली मदत.

सध्या देशात मोठ्या प्रमाणात करोनाबाधितांची वाढ होत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण येत आहे. देशातून आणि देशाबाहेरूनही अनेक जण मदतीसाठी पुढाकार घेत आहेत.  कोरोना विषाणूचा सामना करण्याची लढाई ही विज्ञान आणि सत्यावर आधारित असली पाहजे. तसंच याची पुनरावृत्ती होऊ नये हेदेखील आपण निश्चित केलं पाहिजे. याच मूल्यांच्या आधारावर आपण या महासाथीचा सामना करू शकतो, असं मत विप्रोचे संस्थापक अध्यक्ष अझीम प्रेमजी (Wipro founder chairman Azim Premji) यांनी व्यक्त केलं. 

"आपल्याला प्रत्येक पातळीवर तेजीनं प्रयत्न करणं आवश्यक आहे. आपले प्रयत्न हे विज्ञानावर आधारित असले पाहिजेत. तसंच या महासाथीचा सामना करण्यासाठी त्याचा विस्तार आणि प्रादुर्भावाच्या स्तरावर काम करावं लागेल," असंही अझीम प्रेमजी यांनी स्पष्ट केलं. एएनआयनं यासदंर्भातील वृत्त दिलं आहे. "अशा परिस्थितीत आपल्याला एक राष्ट्र म्हणून एकत्र राहावं लागेल. आपल्याला मतभेद विसरून एकत्र यावं लागेल. यातच शक्ती आहे आणि जर याचा आपण वेगवेगळं राहून सामना केला तर आपल्याला संघर्ष करावा लागेल," असंही त्यांनी नमूद केलं.

सर्वात कमकूवत बाबीपर्यंत आपल्याला लक्ष केंद्रीत करायला हवं. याशिवाय कोरोना महासाथीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर स्थिती दु:खद झाली आहे. परंतु तुम्ही गावांकडे पाहा. जे गरीबीत जीवन जगत आहेत त्यांच्याकडे पाहा. सर्वकाही संपलं आहे. हे केवळ या महासाथीमुळे झालं नाही. तर अर्थव्यस्थेवर झालेल्या परिणामुळेही झालं आहे," असं त्यांनी नमूद केलं. 





गरजवतांना प्राधान्य द्यावं 

"गरजवंतांना मूलभूत सुविधांची आवश्यकता आहे. ते आपलं प्राधान्य असलं पाहिजे. महासाथीचा सामना केल्यानंतर आपल्याला समाज आणि अर्थव्यवस्थेच्या पुनर्निमाणाचं काम करावं लागेल. जेणेकरून कोणावरही असमानता किंवा अन्याय होऊ नये," असंही अझीम प्रेमजी म्हणाले. 

कोरोना लढाईतही प्रेमजी यांची मदत

विप्रो आणि अझीम प्रेमजी फाऊंडेशननं पुण्यातील एका आयटी प्रकल्पाचं ४३० बेड्सच्या रुग्णालयात परिवर्तन केलं आहे. तर दुसरीकडे इन्फोसिसनं नारायण हेल्थच्या माध्यमातून बंगळुरूमध्ये १०० खोल्याचं कोविड रुग्णालय उभारलं आहे. याशिवाय टाटा समूहानं आपल्या कंपन्यांच्या माध्यमातून कोरोनाबाधितांसाठी ५ हजार बेड्स उपलब्ध करून दिले आहे. तर १ हजार क्रायोजनिक कंटेनर्सची आयातही केली आहे. याशिवाय स्टेट बँक, टेक महिंद्रा, सिप्ला, वेदांत, आयटीसी आणि अदानी समूहानंही मदत केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतWiproविप्रोAzim Premjiअझिम प्रेमजी