शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ? हेमंत सोरेन अन् भाजपाच्या नव्या मैत्रीची चर्चा, पडद्यामागे हालचाली
2
धक्कादायक! ५ वर्षांत २ लाख खासगी कंपन्या बंद, केंद्र सरकारचा लोकसभेत खुलासा
3
Canara Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹७९,५०० चं फिक्स व्याज; पाहा कोणती आहे ही स्कीम
4
धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनासाठी देओल कुटुंब हरिद्वारमध्ये; सनी-बॉबी VIP घाटावर करणार विधी
5
BHU मध्ये रात्री उशिरा राडा, विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये दगडफेक, नेमकं काय घडलं?
6
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
7
‘संचार साथी’वर गदारोळ! नको असेल तर डिलीट करा; सरकारचा बचावात्मक पवित्रा
8
"आगाऊ मेंटेनन्स घेणे हे बेकायदा कृत्य; वसुली थांबवण्याचे निर्देश ‘महारेरा’ने बिल्डरांना द्यावेत"
9
‘दुबार’ निकाल टळला; फैसला २१ डिसेंबरलाच; नागपूर व औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय
10
अग्रलेख: डिजिटल टोळ्या जेरबंद होतील? सर्वोच्च न्यायालयाची सजगता स्वागतार्ह
11
आजचे राशीभविष्य, ३ डिसेंबर २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता
12
विशेष लेख: मोदी म्हणतात, ‘काँग्रेस फुटेल!’-खरेच तसे होईल?
13
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
14
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
15
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
16
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
17
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
18
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
19
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
20
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या पक्षसंघटनेत मोठे फेरबदल होणार? भविष्यातील रणनीतीच्या दृष्टीने मोठं पाऊल उचलणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2024 06:46 IST

Congress News: लोकसभा निवडणुकीतील आपली आणि आपल्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीची कामगिरी समाधानकारक असल्याचे लक्षात घेऊन काँग्रेसने भविष्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. यासाठी जबाबदारी निश्चित करून पक्षसंघटनेत मोठ्या बदलाची तयारी पक्षाकडून सुरू आहे.

- आदेश रावल

 नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील आपली आणि आपल्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीची कामगिरी समाधानकारक असल्याचे लक्षात घेऊन काँग्रेसने भविष्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. यासाठी जबाबदारी निश्चित करून पक्षसंघटनेत मोठ्या बदलाची तयारी पक्षाकडून सुरू असून, जवळपास अर्धा डझनहून अधिक प्रदेशाध्यक्ष आणि काही राज्यांचे प्रभारी सरचिटणीस बदलण्यात येणार आहेत.

हिमाचल काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा प्रतिभा सिंह, छत्तीसगडचे प्रदेशाध्यक्ष दीपक बैज, बिहार प्रदेशाध्यक्ष अखिलेश प्रसाद सिंह, झारखंड प्रदेशाध्यक्ष राजेश ठाकूर, उत्तराखंड प्रदेशाध्यक्ष करणसिंह माहरा, मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी आणि पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष अधीररंजन चौधरी यांना बदलले जाऊ शकते. तेलंगणात मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष अशी दुहेरी जबाबदारी सांभाळणारे रेवंत रेड्डी हे प्रदेशाध्यक्षपद सोडू शकतात.

झारखंडचे माजी मंत्री आलमगीर आलम यांच्या जागी नवीन नियुक्ती पक्षाकडून लवकरच होऊ शकते. काँग्रेसचे लक्ष सध्या महाराष्ट्र, हरयाणा आणि झारखंडवर आहे, जिथे लवकरच विधानसभा निवडणुका होत आहेत.

महाराष्ट्रात काय होणार?काँग्रेससाठी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि हरयाणामधील लोकसभा निवडणुकीचे निकाल चांगले राहिले आहेत. त्यामुळे या राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलले जाणार नाहीत. दिल्ली, हरयाणा काँग्रेसचे प्रभारी दीपक बावरिया आणि ओडिशा, तामिळनाडूचे प्रभारी अजॉय कुमार यांच्याकडून फेरबदलात प्रत्येकी एक राज्य काढून घेतले जाण्याची चर्चा आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेRahul Gandhiराहुल गांधी