शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

कपिल शर्मा शोमध्ये सिद्धू दिसणार का?

By admin | Updated: March 22, 2017 00:28 IST

आपल्या मंत्रिमंडळातील सदस्य नवज्योतसिंह सिद्धू यापुढे टीव्हीवरील प्रसिद्ध कॉमेडी शोमध्ये सेलिब्रिटी-परीक्षक म्हणून भाग घेऊ

चंदीगड : आपल्या मंत्रिमंडळातील सदस्य नवज्योतसिंह सिद्धू यापुढे टीव्हीवरील प्रसिद्ध कॉमेडी शोमध्ये सेलिब्रिटी-परीक्षक म्हणून भाग घेऊ शकतात की नाही, याबाबत आपण कायदेशीर सल्ला घेणार आहोत, असे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंह यांनी मंगळवारी सांगितले. नवज्योत सिद्धू ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सेलिब्रिटी जज आहेत. पंजाबचे मंत्री बनल्यानंतर यापुढे त्यांना ही भूमिका पार पाडता येईल का, याबाबत आपण महाधिवक्त्यांचा सल्ला मागविणार आहोत, असे सिंह ते म्हणाले. याबाबत राज्यघटना किंवा कायदा काय म्हणतो, हे मला माहीत नाही. मंत्रिपदी असलेली व्यक्ती टीव्ही शोसाठी काम करू शकते का, याबाबत मी सल्ला घेणार आहे. सिद्धूंचे टीव्हीवर काम करणे पूर्णपणे कायदेशीर सल्ल्यावर अवलंबून राहील. त्यानंतर, मी याबाबत त्यांना कळवेन, असे ते सिंह म्हणाले. उपमुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे असलेल्या सिद्धूंना किरकोळ विभाग देण्यात आला आहे. त्यांना पर्यटन आणि सांस्कृतिकमंत्री बनविण्यात आले आहे. आपल्या टीव्ही शोचा मंत्रिपदाच्या जबाबदारीवर परिणाम होणार नाही, असे सिद्धू म्हणाले आहेत. माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्यासारखा माझा मद्य, वाळू किंवा वाहतुकीचा व्यवसाय नाही. टीव्ही शोच्या माध्यमातून माझा उदरनिर्वाह चालतो. मी सोमवारपासून गुरुवारपर्यंत चंदीगडमध्ये आणि शुक्रवारपासून रविवारपर्यंत अमृतसरमध्ये राहाणार आहे. मी रात्री काय करतो, याच्याशी कोणाला देणे-घेणे असू नये. मुंबईतील चित्रीकरणानंतर पहिल्या विमानाने मी पंजाबला परतेन. (वृत्तसंस्था)