शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

जिओची ग्राहकसंख्या येणार अर्ध्यावर?

By admin | Updated: March 1, 2017 04:25 IST

रिलायन्स जिओच्या ग्राहकांची संख्या ‘वेलकम’ आणि ‘हॅप्पी न्यू ईअर’ योजनांमुळे दहा कोटींच्या घरात गेली आहे.

मुंबई / नवी दिल्ली / कोलकाता : रिलायन्स जिओच्या ग्राहकांची संख्या ‘वेलकम’ आणि ‘हॅप्पी न्यू ईअर’ योजनांमुळे दहा कोटींच्या घरात गेली आहे. पण, १ एप्रिलपासून कंपनी मासिक शुल्क आकारणार असल्याने या ग्राहकांची संख्या झपाट्याने कमी होऊ शकते, असा अंदाज यातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. रिलायन्स जिओच्या ग्राहकांना ‘जिओ प्राइम’अंतर्गत आता ९९ रुपये एकदाच भरावे लागणार आहेत. दर महिन्याला ३०३ रुपये शुल्क आकारले जाईल. याबाबत जिओच्या काही ग्राहकांशी संवाद साधला असता त्यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली असल्याचे दिसून आले. डेटाची स्पीड आणि गुणवत्ता पाहून निर्णय घेणार असल्याचे अनेक जणांनी सांगितले. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सांगितले की, १ एप्रिलपासून ग्राहकांना शुल्क आकारण्यात येणार आहे. सध्याचे सदस्य आणि मार्चपर्यंत जे सदस्य होतील त्यांच्यासाठी काही प्रमाणात सूट देण्यात येणार आहे. १ एप्रिल २०१७ पासून जिओ शुल्क आकारणार आहे. जिओचे सध्याचे सदस्य आणि ३१ मार्चपर्यंत दाखल होणारे ग्राहक यांना एकदाच ९९ रुपये भरून ‘जिओ प्राइम’ या योजनेत सहभागी होता येणार आहे. त्यानंतर दर महिन्याला ३०३ रुपये आकारले जातील. त्याबदल्यात १ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉल, मेसेज मिळणार आहेत.