नवरदेव कोमात, नवरी जोमात; चार फेरे घेताच दागिने घेऊन पसार, मेरठमध्ये खळबळजनक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 07:18 IST2021-04-13T05:12:36+5:302021-04-13T07:18:44+5:30
Crime News : बराच वेळ कोणीच परत न आल्याने, आपली फसवणूक झाल्याचे देवेंद्र आणि त्याच्या कुटुंबीयांच्या लक्षात आले. नवरदेवाने परतापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

नवरदेव कोमात, नवरी जोमात; चार फेरे घेताच दागिने घेऊन पसार, मेरठमध्ये खळबळजनक घटना
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये खळबळजनक घटना समोर आली आहे. एका लग्नसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, यावेळी नवरीने सर्वांनाच धक्का देत दागिने घेऊन पळ काढला. एवढेच नाही, तर तिचे नातेवाईक आदी सर्वच जण खोटे असल्याचे आता समोर आले आहे. लग्नाच्या नावाने आपली खूप मोठी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नवरदेवाने थेट पोलिसात धाव घेतली आहे.
परतापूरच्या एका गावामधील शिव मंदिरात लग्नसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. बराच वेळ कोणीच परत न आल्याने, आपली फसवणूक झाल्याचे देवेंद्र आणि त्याच्या कुटुंबीयांच्या लक्षात आले. नवरदेवाने परतापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
- मुझफ्फरनगर येथील देवेंद्रचे लग्न मेरठच्या परतापूर परिसरात राहणाऱ्या एका तरुणीसोबत ठरले होते. मुलीकडच्यांनी नवरदेवाकडे एक लाख रुपयांची मागणी केली होती.
- लग्नाच्या वेळी मुलाने पैसे आणि सोन्याचे दागिने नवरीला दिले. मात्र सात फेरे घेत असताना, चौथा फेरा झाल्यानंतर नवरीने मध्येच वॉशरूममध्ये जाण्याचे कारण सांगितले; पण बराच वेळ झाला तरी ती परत आलीच नाही. नवरीची मावशी असल्याचे सांगणारी आणखी एक महिला आणि एक व्यक्ती तिला शोधण्याच्या बहाण्याने तिथून निघून गेले.