शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीने प्रियकराला दिली पतीच्या हत्येची सुपारी

By admin | Updated: January 22, 2015 00:07 IST

पत्नीने प्रियकराला दिली पतीच्या हत्येची सुपारी

पत्नीने प्रियकराला दिली पतीच्या हत्येची सुपारी
पत्नीसह पाच आरोपी अटकेत : २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
नागपूर : निवृत्तीनंतर पतीने दमडीही न देण्याचे सांगितल्यामुळे पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा खुन केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. दरम्यान जरीपटका पोलिसांनी राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीत कार्यरत रमेश रावजी देशभ्रतार यांच्या खुन प्रकरणी त्यांच्या पत्नीसह पाच आरोपींना अटक केली आहे.
वंदना देशभ्रतार, तिचा प्रियकर संदीप ऊर्फ अप्पू प्रकाश झोडापे, संदीपचे साथीदार मयूर सुर्यकांत बॅनर्जी, मनीष मेश्राम, सुरज मेश्राम अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पाचही आरोपींना न्यायालयाने २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. वंदना आणि संदीप उर्फ अप्पू झोडापेचे मागील चार वर्षांपासून अनैतिक संबंध होते. त्यांच्या संबंधाची माहिती रमेशला मिळाल्यामुळे वंदना आणि रमेशमध्ये वाद सुरू झाला. तेंव्हापासून ते बाबादीपसिंहनगर येथील घरी राहायला आले. तेथे ते दरबारही भरवायचे. याच दरम्यान मानेवाड्यातील एक महिला दरबारात येत होती. त्या महिलेसोबत रमेशचे अनैतिक संबंध असल्याची शंका वंदनाला आली. यावरून तिने रमेश सोबत वाद घातला. त्यांचा वाद विकोपाला गेला. फेब्रवारी महिन्यात रमेश सेवानिवृत्त होणार होते. त्यांनी आपल्या सेवानिवृत्तीच्या रकमेतून एक दमडीही देणार नसल्याची बतावणी वंदनासमोर केली. पतीच्या रकमेतून काहीच मिळणार नसल्याची बाब वंदनाने तिचा प्रियकर संदीपला सांगितली. त्यामुळे १ लाख रुपये देते, तूच माझ्या पतीचा काटा काढ, असे वंदनाने संदीपला सांगितले. तिने संदीपला एक लाख रुपये दिले. संदीपने इतर तीन साथीदारांच्या मदतीने रमेशच्या खुनाचा कट रचला. १६ जानेवारीला ते बाबादीपसिंहनगरात आले. त्यांनी रमेशला मारहाण करून दुपट्ट्याने त्यांचा गळा आवळून खुन केला. चोरीच्या उद्देशातून खूून करण्यात आल्याचा देखावा निर्माण करण्यासाठी आरोपींनी रमेशच्या घरातील साहित्य व सोन्याची अंगठी चोरून नेली. १७ जानेवारीला ही घटना उघडकीस आली होती. दरम्यान जरीपटका पोलिसांनी संशयावरून रमेशची पत्नी वंदनाला ताब्यात घेतले. तिची चौकशी केली असता तिने आपणच पतीच्या खुनाची सुपारी दिल्याचे कबूूल केले. (प्रतिनिधी)