शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

"गुजरातमध्ये जप्त हेरॉइनबद्दल नरेंद्र मोदी, शहा यांचे मौन का?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 10:06 IST

काँग्रेससह विरोधी पक्ष विचारत आहेत की, मुंद्रा बंदराचे मालक अदानी असल्यामुळे मोदी यांनी मौन धारण केले आहे का? काँग्रेसने दावा केला की, मुंद्रा बंदरात पकडले गेलेले अमली पदार्थ आतापर्यंतचे सगळ्यात जास्त असून, ते संपूर्ण देशातील युवकांना अमली पदार्थांचे व्यसन लावण्यास पुरेसे आहे.

शीलेश शर्मा -नवी दिल्ली : गुजरातमधील मुंद्रा बंदरात पकडल्या गेलेल्या ३ हजार किलोग्रॅम अमली पदार्थावर (हेरॉइन) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बाळगलेल्या मौनानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे.काँग्रेससह विरोधी पक्ष विचारत आहेत की, मुंद्रा बंदराचे मालक अदानी असल्यामुळे मोदी यांनी मौन धारण केले आहे का? काँग्रेसने दावा केला की, मुंद्रा बंदरात पकडले गेलेले अमली पदार्थ आतापर्यंतचे सगळ्यात जास्त असून, ते संपूर्ण देशातील युवकांना अमली पदार्थांचे व्यसन लावण्यास पुरेसे आहे.अफगाणिस्तानमधून गुजरातला हेरॉईन पोहोचले कसे, अमली पदार्थ विभाग आणि गुप्तचर यंत्रणा काय करीत होत्या? कारण हे ड्रग सामान्य तपासणीत पकडले गेले. विभागाला त्याची काहीही पूर्वकल्पना नव्हती. एवढ्या मोठ्या प्रमाणावर ड्रग पकडले गेल्यावर असा प्रश्न उपस्थित होतो की, ड्रगची तस्करी करणाऱ्यांनी गुजरातमधील त्याच बंदराला का निवडले जो अदानी यांचा आहे? काँग्रेसने ११ प्रश्न विचारून विचारले की, गेल्या १८ महिन्यापासून नार्कोटिक विभागाचे महासंचालकपद का रिक्त आहे? पक्षाचे प्रवक्त्याने यामागे सरकारचा हेतू काय? असे विचारले आहे.

सुरजेवाला म्हणाले...- या तस्करीमागे कोणते लोक आहेत व त्यांना कोण मदत करीत आहे याची उत्तरे सरकारने द्यावीत, असे काँग्रेसचे महासचिव रणदीप सूरजेवाला म्हणाले. ते म्हणाले की,“गुजरातमध्ये अदानी मुंद्रा बंदरावर जप्त ३ हजार किलो ड्रग्जची किमत २१ हजार कोटी रुपये सांगितली जात आहे. - हे ड्रग्ज तालिबानकडून पाठविले जात आहे. मोदी यांनी सांगावे की, भारतातील युवकांना नशेत ढकलण्याच्या कटात कोण दोषी आहे आणि आतापर्यंत किती हजारो कोटी रुपयांचे अमली पदार्थ तपासाविनाच निसटून गेले?” 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहBJPभाजपाGujaratगुजरातcongressकाँग्रेस