शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

अमृत स्नानाच्या मुहुर्तांऐवजी मोदींनी महाकुंभमेळ्यात येण्यासाठी का निवडली ५ तारीख? असं आहे कारण   

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 15:45 IST

Narendra Modi News: महाकुंभामध्ये पवित्र स्नान करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही प्रयागराज येथे येणार आहेत.  नरेंद्र मोदी हे बुधवारी ५ फेब्रुवारी रोजी महाकुंभमेळ्यात स्नान करणार आहेत. मात्र महाकुंभमधील अमृत स्नानाच्या मुहुर्तांऐवजी नरेंद्र मोदी यांनी ५ फेब्रुवारी हा दिवस का निवडला याची चर्चा सुरू आहे.

उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सध्या महाकुंभमेळा सुरू आहे. या महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान करण्यासाठी कोट्यवधी भाविक प्रयागराज येथे येत आहेत. देशाबरोबरच परदेशातूनही हजारो लोक येत आहेत. दरम्यान, या महाकुंभामध्ये पवित्र स्नान करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही प्रयागराज येथे येणार आहेत.  नरेंद्र मोदी हे बुधवारी ५ फेब्रुवारी रोजी महाकुंभमेळ्यात स्नान करणार आहेत. मात्र महाकुंभमधील अमृत स्नानाच्या मुहुर्तांऐवजी नरेंद्र मोदी यांनी ५ फेब्रुवारी हा दिवस का निवडला याची चर्चा सुरू आहे. तर मोदींनी हा दिवस निवडण्यामागचं खास कारण आणि त्यांच्या दौऱ्याची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे आहे.   

हिंदू पंचांगानुसार ५ फेब्रुवारी रोजी माघ महिन्यातील गुप्त नवरात्रीमधील अष्टमी ही तिथी आहे. ती धार्मिक दृष्ट्या अत्यंत शुभ मानली जाते. या दिवशी तप ध्यान आणि साधना करणं अत्यंत फलदायी मानलं जातं.  या दिवशी जे लोक तप, ध्यान आणि स्नान करतात, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी श्रद्धा आहे. याशिवाय हा दिवस भीष्माष्टमीच्या रूपात ओळखला जातो. याबाबतच्या अधिकन माहितीनुसार महाभारतातील युद्धादरम्यान, शरशय्येवर पडलेले भीष्म पितामह हे सूर्याने उत्तरायणाला सुरुवात करण्याची आणि शुक्ल पक्षाच्या सुरुवातीची वाट पाहत होते. माघ महिन्याच्या अष्टमीदिवशी त्यांनी श्रीकृष्णाच्या उपस्थितीत आपले प्राण त्यागले. त्यानंत त्यांना मोक्ष प्राप्ती झाली.  

दरम्यान, नरेंद्र मोदी हे बुधवारी महाकुंभमध्ये जाणार असून, त्यांच्या कार्यक्रमात काही बदल करण्यात आला आहे.  नव्या कार्यक्रमानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाकुंभमेळ्यात एक तासच थांबणार आहे. तसेच पूर्वनियोजित काही कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार नाहीत. पंतप्रधान मोदी ५ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे १० वाजू ५ मिनिटांनी प्रयागराज येथील विमानतळावर पोहोचतील. त्यानंतर १० वाजून १० मिनिटांनी डीपीएस हेलिपॅडवर पोहोचतील. तसेच १० वाजून ४५ मिनिटांनी नरेंद्र मोदी हे अरेल घाट येथे उपस्थित राहतील.   

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीKumbh Melaकुंभ मेळा