शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आजही देशाच्या भूमीत चीनचे सैनिक का बसले आहेत; काँग्रेसचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 06:25 IST

गलवान खोऱ्यातील संघर्षाला वर्ष पूर्ण; २० जवान झाले होते शहीद

- शीलेश शर्मा लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी झालेल्या संघर्षात २० सैनिकांना हौतात्म्य मिळाले. त्यानंतरही महत्त्वाच्या ठिकाणांवर चीनचे सैनिक बसले असून मोदी सरकार मौन बाळगून आहे, असा आरोप काँग्रेसने केला.

पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून १५ जून, २०२० रोजी झालेल्या त्या संघर्षाची आठवण करून देत मागणी केली की, मोदी सरकारने देशाला विश्वासात घ्यावे म्हणजे देश आणि सीमेवर उभ्या असलेल्या जवानांना खात्री वाटेल की, सरकार म्हणते तसे वागत आहे.पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी १५-१६ जून रोजीच्या त्या घटनेवर व्हिडिओसह ट्वीटरवर भाष्य केले. ते म्हणाले, “ त्या घटनेशी संबंधित अनेक प्रश्न आहेत की ज्यांची उत्तरे मिळाली नाहीत. सरकार जनतेला जबाबदार आहे.” पक्षाचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला म्हणाले की, “आमच्या २० योद्ध्यांना हुतात्मा होऊन एक वर्ष झाले. चीनचा आजही आमच्या जमिनीवर कब्जा आहे. मोदी सरकार देशाच्या संरक्षणात अपयशी ठरले आहे.” पक्षाच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी मोदी यांच्यावर टीका करताना आठवण करून दिली की, मोदी म्हणाले  होते की “कोणी घुसखोरी केलेली नाही.” 

‘सर्वोच्च बलिदान कायम देशाच्या स्मरणात राहील’n    पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात गेल्या वर्षी १५ व १६ जून रोजी चीनच्या सैन्याशी लढताना हुतात्मा झालेल्या २० भारतीय जवानांना लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांंनी मंगळवारी आदरांजली अर्पण केली. n    जनरल नरवणे म्हणाले,“चीनच्या अभूतपूर्व अशा आक्रमणात जवानांनी अतिशय कठीण अशा उंच भागात लढून केलेले सर्वोच्च बलिदान देशाच्या कायम स्मरणात कोरलेले राहील.” जवळपास पाच दशकांनंतर चीनशी प्रथमच झालेला हा अत्यंत हिंसक असा संघर्ष होता.

टॅग्स :chinaचीनIndian Armyभारतीय जवानladakhलडाख