शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

कोण हा प्रदीप शर्मा ?

By admin | Updated: September 22, 2014 04:36 IST

येत्या विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय आखाड्यात उतरू पाहणारे वादग्रस्त माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांचे भवितव्य अद्याप अधांतरीच आहे

गौरीशंकर घाळे, मुंबईयेत्या विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय आखाड्यात उतरू पाहणारे वादग्रस्त माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांचे भवितव्य अद्याप अधांतरीच आहे. शर्मा यांनी महायुतीकडून उमेदवारी मिळावी म्हणून त्यांनी प्रयत्न चालविले असले तरी शिवसेना आणि भाजपाने त्यांना अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. प्रदीप शर्मा अंधेरी पश्चिमेतून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. महिनाभर त्यांनी तसे प्रयत्नही चालविले आहेत. अंधेरीत ठिकठिकाणी शर्मा यांचे बॅनर्स आणि पोस्टर्स झळकत आहेत. लोकांच्या गाठीभेटी घेण्याचे सत्रही त्यांनी चालविले आहे. स्वत:ला महायुतीचा उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करणाऱ्या शर्मांच्या उमेदवारीबाबत एकीकडे शिवसेना आणि भाजपा नेते मौन बाळगून आहेत, तर दुसरीकडे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही जोरदार विरोध चालविला आहे. अलीकडेच स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्याचे कळते. शर्मा यांची वरिष्ठ भाजपा नेत्यांशी ऊठबस असली तरी युतीच्या जागावाटपात अंधेरीची ही जागा शिवसेनेकडे आहे. काही दिवसांपासून शर्मा विविध कार्यक्रमांत भाजपा नेत्यांची सोबत दिसत आहेत. मात्र शर्मा आणि भाजपासाठी मतदारसंघावरील दावा सोडण्यास शिवसेना तयार नाही. विशेष म्हणजे मागील तीन विधानसभा निवडणुकांत शिवसेनेला येथून पराभवाचा सामना करावा लागला होता. एन्काउंटरफेम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शर्मांच्या प्रसिद्धीचा फायदा होणार की त्यांच्या वादग्रस्त पार्श्वभूमीचा फटकाच बसणार, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. मतदारसंघ भाजपाला सुटल्यास वरिष्ठ पातळीवरून उमेदवारी मिळविण्याचे आडाखे बांधण्यात येत होते. ही शक्यताही आता धूसर बनल्याने शर्मा स्वतंत्रपणे रिंगणात उतरणार असल्याचा दावा त्यांचे समर्थक करताहेत.