शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

'झारखंड टायगर' नावाने प्रसिद्ध; कोण आहेत झारखंडचे नवनिर्वाचीत मुख्यमंत्री चंपई सोरेन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 22:03 IST

हेमंत सोरेन यांनी राजीनामा दिल्यानंतर चंपई सोरेने यांना झारखंडचे मुख्यमंत्री करण्यात आले आहे.

Who is Champai Soren (Marathi News) :झारखंडमध्ये मोठी राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहे. कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी ED चौकशी सुरू असलेल्या हेमंत सोरेन यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. दरम्यान, त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला असून, JMM आमदारांनी चंपई सोरेन यांची विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. 'झारखंड टायगर' म्हणून प्रसिद्ध असलेले चंपई सोरेन आता राज्याचे पुढील मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. 

कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पथक हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानी पोहचले. आज दुपारपासून ईडीने सोरेन यांची चौकशी केली. त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. अशा परिस्थितीत त्यांनी चंपई सोरेन यांना झारखंडचे नवीन मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केले आहे. हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर त्याची पत्नी कल्पना सोरेन यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सूत्रे सोपवली जातील, अशी अटकळ बांधली जात होती. परंतु सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे चंपई सोरेन यांच्याकडे सोपवली आहे. 

कोण आहे चंपाई सोरेन?चंपई सोरेन हे सरायकेला-खरसावन जिल्ह्यातील जिलिंगगोडा गावचे रहिवासी आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव सिमल सोरेन असून ते शेती करायचे. चार मुलांमध्ये चंपई सर्वात मोठे आहेत. चंपई यांनी सरकारी शाळेत दहावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यांचे लहान वयातच माणको यांच्याशी लग्न झाले. चंपई यांना 4 मुलगे आणि तीन मुली आहेत.

याच काळात बिहारपासून वेगळ्या झारखंड राज्याची मागणी जोर धरू लागली. शिबू सोरेन यांच्यासोबत चंपईदेखील झारखंडमधील चळवळीत सामील झाले. या काळात ते 'झारखंड टायगर' नावाने प्रसिद्ध झाले. यानंतर चंपई सोरेन यांनी सरायकेला मतदारसंघातून पोटनिवडणुकीत अपक्ष आमदार बनून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर ते झारखंड मुक्ती मोर्चात सहभागी झाले.

भाजप सरकारमध्ये मंत्रीही राहिले भाजप नेते अर्जुन मुंडा यांच्या 2 वर्षे 129 दिवसांच्या सरकारमध्ये JMM नेते चंपई सोरेन यांना कॅबिनेट मंत्री बनवण्यात आले होते. या काळात त्यांनी अनेक महत्त्वाची मंत्रिपदे भूषवली. चंपाई 11 सप्टेंबर 2010 ते 18 जानेवारी 2013 पर्यंत मंत्री होते. त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. पुढे हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील झारखंड मुक्ती मोर्चा सरकारमध्ये चंपई सोरेन यांना अन्न, नागरी पुरवठा आणि वाहतूक मंत्री करण्यात आले.

हेमंत सोरेन सरकारमध्ये दुसऱ्यांदा मंत्री हेमंत सोरेन 2019 मध्ये पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावर चंपई यांना परिवहन, अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती आणि मागासवर्गीय कल्याण मंत्री करण्यात आले आहे. चंपाई झामुमोचे उपाध्यक्षही आहेत. आता त्यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली आहे. म्हणजेच ते चंझारखंडचे नवीन मुख्यमंत्री असतील.

टॅग्स :JharkhandझारखंडPoliticsराजकारणJharkhand Mukti Morchaझारखंड मुक्ती मोर्चाChief Ministerमुख्यमंत्रीBJPभाजपाcongressकाँग्रेसEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय