भारतातील कोणत्या ठिकाणांवर हल्ला करायचा ? पाकिस्तानने आखला ऑपरेशनल प्लान

By Admin | Updated: September 23, 2016 20:52 IST2016-09-23T20:52:07+5:302016-09-23T20:52:29+5:30

भारतासोबत युद्धपरिस्थिती उद्भवली तर कोणत्या ठिकाणांवर हल्ला करण्यात यावा याची निवड पाकिस्तानने करुन ठेवली आहे

Which places in India should be attacked? Pakistan's last operational plan | भारतातील कोणत्या ठिकाणांवर हल्ला करायचा ? पाकिस्तानने आखला ऑपरेशनल प्लान

भारतातील कोणत्या ठिकाणांवर हल्ला करायचा ? पाकिस्तानने आखला ऑपरेशनल प्लान

>ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. 23 - भारतासोबत युद्धपरिस्थिती उद्भवली तर कोणत्या ठिकाणांवर हल्ला करण्यात यावा याची निवड पाकिस्तानने करुन ठेवली आहे. जिओ टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तान लष्कराने यासंबंधी ऑपरेशनल प्लान तयार केला आहे. सीमारेषेपलीकडून हल्ला झाल्यास उत्तर देण्यास सज्ज राहण्याची तयारी पाकिस्तान करत आहे. 
 
भारताशी लढण्यासाठी पाकिस्तान पुर्णपणे तयार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. भारतीय लष्कराचा मुकाबला करण्यास पाकिस्तान पुर्णपणे सज्ज आहे. 'आमचा ऑपरेशनल प्लान तयार आहे. कोणत्या ठिकाणांवर हल्ला करायचा ठरलं असून सर्व सैन्यांना याची माहिती देण्यात आली आहे,' असं संरक्षण खात्याच्या सुत्रांकडून कळलं आहे.
 
गेल्या काही दिवसांमध्ये सुरु असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभुमीवर पाकिस्तानमधील सैन्य हाय अलर्टवर ठेवण्यात आलं आहे. भारताला आमच्या सामर्थ्याची कल्पना आहे. आमचं लष्कर अंतर्गत सुरक्षेत व्यस्त असलं तरी सीमारेषेवरुन येणा-या कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यास तयार असल्याचं पाकिस्तानमधील अधिका-याने सांगितल्याचं सुत्रांकडून कळलं आहे.
 

Web Title: Which places in India should be attacked? Pakistan's last operational plan