शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
2
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
3
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
5
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
6
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
7
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
8
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
9
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
10
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
11
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
12
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
13
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
14
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
15
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
16
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
17
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
18
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
19
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
20
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशमन विभाग सुसज्ज केव्हा होणार?

By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST

शहराचा विकास : उंच इमारतीत आग लागल्यास नियंत्रण यंत्रणा नाही

शहराचा विकास : उंच इमारतीत आग लागल्यास नियंत्रण यंत्रणा नाही
नागपूर : विस्तारासोबतच शहरात टोलेजंग इमारती उभ्या राहात आहेत. परंतु महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे १५-२० वर्षापूर्वी जी यंत्रणा होती तीच आजही आहे. शहरात २०-२२ मीटर उंचीच्या इमारतीत आग लागल्यास ती आटोक्यात आणणारी यंत्रणा या विभागाकडे नाही. हा विभाग सुसज्ज केव्हा होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आपत्ती व्यवस्थापनावर दरवर्षी चर्चा होते. पावसाळा व उन्हाळ्याच्या दिवसात आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क असल्याचा दावा केला जातो. परंतु अग्निशमन विभागाकडे सक्षम यंत्रणा नसल्याने उंच इमातीला आग लागल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
१५ वर्षापूर्वी शहरात पाच अग्निशमन केंद्रे होती. विभागात ३०० कर्मचारी व अधिकारी होते. मागील काही वर्षात शहराचा विस्तार होऊ न लोकसंख्या ३० लाखांवर गेली आहे. १० अग्निशमन केंद्रे झाली परंतु विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांची संख्या मात्र आजही तितकीच आहे.
शहरात हुडकेश्वर, नरसाळा भागाचा समावेश करण्यात आला आहे. मिहान सारखे मोठे प्रकल्प उभे राहात आहेत. एम्प्रेस सिटी, आनंदम् यासारख्या टोलेजंग इमारती उभारण्यात आलेल्या आहेत. बैद्यनाथ चौकाच्या बाजूला भव्य मॉल्स व निवासी संकुल उभारले जात आहे. सोबतच शहरात ४५ ते ६० मीटर उंचीच्या इमारती उभ्या राहात आहेत. परंतु अशा इमारतीच्या वरच्या माळ्यावर आग लागल्यास ती आटोक्यात आणता येणारी टीटीएलसारखी यंत्रणा अग्निशमन विभागाकडे नाही. (प्रतिनिधी)
चौकट...
प्रस्ताव प्रलंबित
शहराचा होत असलेला विकास विचारात घेता अग्निशमन विभागाने टीटीएल यंत्र खरेदीचा राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. परंतु मागील काही वर्षापासून तो प्रलंबित आहे. यावर पाच कोटीचा खर्च अपेक्षित आहे. याबाबत दोनदा ग्लोबल निविदा काढण्यात आल्या. आता तिसऱ्यांना निविदा काढण्यात आली. पण पुढे काय हा प्रश्न कायम आहे.
चौकट...
२५० अधिकारी व कर्मचाऱ्यांची गरज
अग्निशमन विभागाला ५० अधिकारी व २०० कर्मचाऱ्यांची गरज आहे. तसेच शहराचा विस्तार व लोकसंख्या विचारात घेता अत्याधुनिक यंत्रणेची गरज आहे. विभागाला वर्षाला पाच कोटी मिळतात परंतु याचा योग्य प्रकारे विनियोग होत नसल्याचे चित्र आहे.