शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

WhatsApp च्या नव्या पॉलिसीला उच्च न्यायालयात आव्हान; स्थगिती आणण्याची मागणी

By जयदीप दाभोळकर | Updated: January 14, 2021 18:55 IST

नवी प्रायव्हसी पॉलिसी अ‍ॅक्सेप्ट न केल्यास अकाऊंड डिलीट केलं जाणार असल्याचं व्हॉट्सअ‍ॅपनं म्हटलं होतं.

ठळक मुद्देनवी पॉलिसी अॅक्सेप्ट न केल्यास अकाऊंट डिलीट केलं जाणार असल्याचं सांगण्यात आलं होतं.सरकारनं यात लक्ष देण्याची याचिकेद्वारे मागणी

व्हॉट्सअ‍ॅपनं आपल्या युजर्संना पॉपअप मेसेज पाठवला असून यामध्ये युजर्संना नियम व अटीसोबत नव्या प्रायव्हसी पॉलिसीबाबत सांगितलं आहे. व्हॉट्सअ‍ॅप कशा पद्धतीने तुमचा डेटा वापरणार आहे, तसंच व्हॉट्सअ‍ॅपच्या युजसाठी या नियम व अटी अ‍ॅक्सेप्ट कराव्या लागणार आहेत. जर त्या नियम आणि अटी अ‍ॅक्सेप्ट केल्या नाही तर युजर्सचे अकाऊंट डिलीट केलं जाईल असं मेसेजमध्ये म्हटलं आहे. यानंतर अनेकांनी व्हॉट्सअ‍ॅपच्या या नव्या पॉलिसीचा विरोध केला होता. तर अनेकांनी व्हॉट्सअ‍ॅपचा पर्यायही शोधण्यास सुरू केला होता. दरम्यान, व्हॉट्सअ‍ॅपच्या या नव्या पॉलिसीला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या या नव्या पॉलिसीवर त्वरित स्थगिती आणण्याची मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे.दरम्यान, कोणत्याही व्यक्तीच्या राईट टू प्रायव्हसी अधिकाराचं हे उल्लंघन असल्याचंही याचिकेत नमूद करण्यात आलं आहे. पेशानं वकिल असेलेल्या चैतन्या रोहिल्ला यांनी दिल्ली उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकसारख्या कंपन्या बेकायदेशीररित्या सामान्य लोकांचा डेटा तिसऱ्या पक्षासोबत शेअर करत आहेत. तसंच सरकारच्या परवानगीशिवाय ही पॉलिसी तयार करण्यात आल्याचंही याचिकेत नमूद करण्यात आलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या या नव्या पॉलिसीवर त्वरित स्थगिती आणण्यात यावी तसंच भारत सरकार व्हॉट्सअ‍ॅपच्या वापरासाठी आणि लोकांच्या राईट टू प्रायव्हसीसाठी काही मार्गदर्शत तत्वे जाहीर करण्यात यावी, अशी मागणीही याद्वारे करण्यात आली आहे. भारत सरकार माहित तंत्रज्ञान कायद्याच्या 79(2) (C) आणि और कलम 87 (2) (ZG) अंतर्गत सरकारनं व्हॉट्सअ‍ॅप आपली माहिती तिसऱ्या पक्षाला देऊ नये याकडे लक्ष द्यावं असंही याचिकेत नमूद करण्यात आलं आहे. 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपHigh Courtउच्च न्यायालयIndiaभारत