शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

"गेल्या ७१ वर्षांत लडाखला जे नाही मिळाले, ते मोदींच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षभरात मिळाले"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 12:12 IST

लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाल्याचा पहिल्या वर्धापनदिनानिमित्त काल लडाखमध्ये विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

लडाख - जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणार कलम ३७० हटवून राज्याचे जम्मू काश्मीर आणि लडाख असे द्विभाजन झाल्याच्या घटनेस काल एक वर्ष पूर्ण झाले. दरम्यान, लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाल्याचा पहिल्या वर्धापनदिनानिमित्त काल लडाखमध्ये विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी भाजपा खासदार जमयांग सेरिंग नामग्याल यांनी लडाख केंद्रशासित प्रदेश बनल्याने लडाखवासियांची दीर्घकालापासूनची मागणी पूर्ण झाल्याची प्रतिक्रिया दिली. तसेच ''गेल्या ७१ वर्षांत लडाखला जे नाही मिळाले ते मोदींच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षभरात मिळाले'', असे नामग्याल यांनी सांगितले.कलम ३७० रद्द झाल्याच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात संबोधित करताना नामग्याल म्हणाले की, हा लडाख आणि संपूर्ण देशासाठी ऐतिहासिक दिवस आहे. कलम ३७० आणि कलम ३५ अ रद्द करून जम्मू काश्मीर पुनर्गठन कायद्यांतर्गत राज्याचे जम्मू काश्मीर आणि लडाख अशा दोन केंद्रशासित भागात विभाजन झाले. लडाखला केंद्रशासित प्रदेश बनवल्याने येथील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी पू्र्ण झाली आहे.गेल्या वर्षभरात विद्यापीठ, वैद्यकीय महाविद्यालय, हॉटेल मॅनेजमेंट इंस्टिट्युट यांची स्थापना करून लडाखने विकासाच्याबाबतीत बरेच टप्पे गाठले आहेत. सललेल्या आणि चालू आर्थिक वर्षात विशेष आर्थिक पॅकेज म्हणून लडाखला ११ हजार कोटी रुपये मिळाले आहेत. तसेच मिशन ऑर्गेनिक डेव्हलपमेंट इंटेंटिव्ह अंतर्गत लेहसाठी २५० आणि कारगिलसाठी २५० कोटी रुपये मिळाले आहेत. लडाखला गेल्या ७१ वर्षांत जे काही मिळाले नव्हते, ते गेल्या वर्षभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मिळाले, असेही नामग्याल म्हणाले.

टॅग्स :ladakhलडाखIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा