शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

Coal Scam Case: टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जींच्या पत्नीचं EDला पत्र; जाणून घ्या, काय म्हणाल्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 17:37 IST

रुजिरा बॅनर्जी यांना आज म्हणजेच 1 सप्टेंबरला ईडीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले होते, तर अभिषेक बॅनर्जी यांना 3 सप्टेंबरला बोलावण्यात आले होते.

कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांची पत्नी रुजिरा यांनी एक पत्र लिहून अंमलबजावणी संचालनालयासमोर (ED) हजर राहण्यास असमर्थता व्यक्त केली आहे.  अलीकडेच, कोळसा घोटाळाप्रकरणी, ईडीने तृणमूलचे सरचिटणीस आणि डायमंड हार्बरचे खासदार अभिषेक बॅनर्जी आणि त्यांच्या पत्नीला समन्स जारी करून चौकशीसाठी दिल्लीत बोलावले होते. रुजिरा बॅनर्जी यांना आज म्हणजेच 1 सप्टेंबरला ईडीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले होते, तर अभिषेक बॅनर्जी यांना 3 सप्टेंबरला बोलावण्यात आले होते.

पत्रात रुजिरा यांनी एजन्सीच्या अधिकाऱ्यांना विनंती केली आहे, की त्यांनी कोलकाता येथील आपल्या निवासस्थानी येऊन चौकशी करावी. रुजिरा यांनी ईडीचे सहाय्यक संचालक सुमत प्रकाश जैन यांना हे पत्र लिहिले आहे. यात त्या म्हणाल्या, "18 ऑगस्ट 2021 रोजी आलेल्या समन्समध्ये मला 1 सप्टेंबरला नवी दिल्ली येथे प्रत्यक्ष हजर राहण्यास सांगितले गेले आहे. मी दोन मुलांची आई आहे आणि सध्याच्या साथीच्या काळात एकट्याने नवी दिल्लीला प्रवास केल्यास मला आणि माझ्या मुलांना धोका निर्माण होऊ शकतो.

रुजिरा म्हणाल्या, "जर आपण मला कोलकात्यातील माझ्या निवासस्थानीच उपस्थित राहण्यास सांगाल, तर ते माझ्यासाठी सोयिस्कर होईल.  कारण आपल्या संस्थेचे कार्यालयही कोलकात्यातच आहे आणि मीही कोलकात्यातच राहते, असे रुजिरा यांनी म्हटले  आहे.

ममता बॅनर्जी यांच्या भाच्याच्या मागेही ‘ईडी’; अभिषेक यांच्या बँक खात्यांची मागवली माहिती

"याशिवाय, माझ्या मते, आपल्या तपासाचा विषय आणि कारवाईचे कथित कारणही पश्चिम बंगालशी संबंधितच आहे. आपण आपला निर्णय अवश्य कळवावा. मी आपल्याला माझ्या बाजूने संपूर्ण सहकार्याचे आश्वासन देते," असेही रुजिरा यांनी म्हटले आहे. यापूर्वी, कोळसा चोरी प्रकरणासंदर्भात सीबीआयच्या पथकाने फेब्रुवारी महिन्यातही रुजिरा यांची त्याच्या निवासस्थानीच चौकशी केली होती.

ममतांनी साधलाहोता निशाणा - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी शनिवारी भाजपवर जोरदार निशाणा साधला. ईडीने पुतण्या अभिषेक बॅनर्जीला जारी केलेल्या समनवरून ममता भडकल्या आहेत. आपण यांना घाबरणार नाही, असे ममतांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर तुम्ही आम्हाला ईडीची भीती दाखवली, तर आम्हीही भाजप नेत्यांच्या विरोधात केंद्रीय एजन्सींना पुरावे पाठवू, असेही ममतांनी म्हटले आहे.

ममता म्हणाल्या, तुम्ही आमच्या विरोधात ईडीचा वापर का करत आहात, तुमच्याशी कसे लढायचे हे आम्हाला माहीत आहे, आम्हाला गुजरातचा इतिहासही माहित आहे. तुमच्या एका प्रकरणाविरोधात, आम्ही बॅग भरून प्रकरणं काढू. कोळशाच्या भ्रष्टाचारासाठी तृणमूलकडे बोट दाखवून उपयोग नाही. हे केंद्रांतर्गत आहे. याच्या मंत्र्यांचे काय? त्या भाजप नेत्यांचे काय, ज्यांनी बंगाल, आसनसोल भागातील कोळशाचा बेल्ट लुटला, असे प्रश्नही ममतांनी यावेळी उपस्थित केले.  

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयTrinamool Congressतृणमूल काँग्रेस