शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

लवकरात लवकर लस आयात करा; बंगालमध्ये जमिन देण्यासही तयार; ममता बॅनर्जींचं मोदींना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 20:07 IST

Coronavirus Vaccine : लसीची कमतरता दूर करण्यासाठी लस आयात करण्याची ममता बॅनर्जींची मागणी. पश्चिम बंगालमध्ये कंपन्यांसाठी जागा देण्यासही तयार असल्याचं वक्तव्य.

ठळक मुद्देलसीची कमतरता दूर करण्यासाठी लस आयात करण्याची ममता बॅनर्जींची मागणी.पश्चिम बंगालमध्ये कंपन्यांसाठी जागा देण्यासही तयार असल्याचं वक्तव्य.

सध्या देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत लसीकरण हा त्यावरील उपाय असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, लसींसंदर्भात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. तसंच लसींची कमतरता दूर करण्यासाठी लवकरात लवकर लसी आयात केल्या पाहिजे, असं त्यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे. या पत्रात त्यांनी आंतरराष्ट्रीय लस उत्पादकांकडून लस खरेदी करण्याची मागणी केली आहे. 

"बंगालच्या १० कोटी आणि देशाच्या १४० कोटी नागरिकांसाठी लसीची आवश्यकता आहे. सध्या छोट्या प्रमाणात लसीकरण झालं आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय लस उत्पादकांकडून लस आयात करू सकतो. तसंच यासाठी तज्ज्ञांचा आणि वैज्ञानिकांचा सल्लाही घेतला जाऊ शकतो," असं ममता बॅनर्जी यांनी पत्रात नमूद केलं आहे.

"आपण आंतरराष्ट्रीय लस उत्पादकांना भारतात फ्रेन्चायझी उघडण्यासाठी आमंत्रित करू शकतो. तसंच आपल्या देशातील कंपन्याही फ्रेन्चायझी मोडवर काम करू शकतात. जेणेकरून अधिक लस उत्पादन करता येईल. आम्ही बंगालमध्ये कंपन्यांना फ्रेन्चायझी सुरू करण्यासाठी जमिन आणि सहकार्य देण्यास तयार आहोत," असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे. 

जागतिक निविदा उत्तम ठरल्या असत्या - गेहलोत"देशात कोरोना लसीच्या कमतरतेमुळे अनेक राज्य अन्य राज्यांकडून लस घेण्यासाठी जागतिक निविदा काढतआहे. यापेक्षा केंद्र सरकारनं जागतिक निविदा काढून लसी खरेदी केल्या असत्या आणि राज्यांमध्ये वितरित केल्या असत्या. त्यानंतर राज्यांकडून केंद्रानं पैसे घेतले असते," असं मत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विटरवरून व्यक्त केलं. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसwest bengalपश्चिम बंगालNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतRajasthanराजस्थानAshok Gahlotअशोक गहलोत