शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
7
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
8
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
9
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
10
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
11
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
12
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
13
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
14
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
15
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
16
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
17
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
18
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
19
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
20
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मोदींचा रोड शो आणि योध्याप्रमाणे स्वागत!

By admin | Updated: March 13, 2017 00:49 IST

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमधील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी भाजपा मुख्यालयात आले तेव्हा त्यांचे एखाद्या योध्याप्रमाणे स्वागत केले गेले

सुरेश भटेवरा, नवी दिल्लीपाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमधील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी भाजपा मुख्यालयात आले तेव्हा त्यांचे एखाद्या योध्याप्रमाणे स्वागत केले गेले. निमित्त होते भाजपाच्या विजय यात्रेचे, पण प्रत्यक्षात तो खास मोदी स्टाईलचा रोड शो झाला.११, अशोका रोडवरील भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयात रविवारी सकाळपासून उत्सवी वातावरण होते. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत होणाऱ्या विजयोत्सवात सहभागी होण्यासाठी हजारो कार्यकर्ते आले होते. ढोल नगाऱ्यांच्या तालावर होळीचे रंग उधळत सकाळपासून ते नाचत होते. एकमेकांना मिठाई भरवीत होते.दुपारपासून गर्दी वाढू लागली. पोलीस बंदोबस्त वाढला. अशोका रोड पूर्णत: मोकळा करण्यात आला. दिल्ली, राजस्थान हरयाणातून आलेल्या पक्ष कार्यक र्त्यांची गर्दी इथे उसळली होती. या गर्दीला दोन्ही बाजूंच्या पदपथांवर बॅरिकडेच्या मागे सारून थोपवण्यात आले. उपस्थितांना संबोधित करण्यासाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले होते. मुख्यालयाच्या आत मोदी पोहोचले तेव्हा त्यांची एक झलक टिपण्यासाठी सर्वांची जणू स्पर्धा लागली होती.सायंकाळी सव्वा सहा वाजता विंडसर प्लेसवरील ली मेरिडियन हॉटेलपासून भाजपची विजय यात्रा सुरू झाली. एका भव्य रथावर मोदी आणि अमित शाह यांचे भलेमोठे कटआऊ ट सजवले होते. यात्रेत विजयाचे मुख्य शिल्पकार पंतप्रधान मोदींनी, सुरूवातीचे काही अंतर कारने पार केले. यात्रेचा काफिला अशोका रोडवर पोहोचताच, हरहर मोदी... वंदे मातरम, घोषणांचा जयघोष सुरू झाला. जवळपास २00 मीटर अंतर पायी चालत, रस्त्याच्या दुतर्फा उभ्या कार्यकर्त्यांच्या अभिनंदनाचा स्वीकार करीत, मोदी विजयी योध्याच्या आवेशात मुख्यालयात पोहोचले. मोदी व अमित शाह यांच्या स्वागतासाठी इथे जय्यत तयारी करण्यात होती.