शहरं
Join us  
Trending Stories
1
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
2
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
7
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
8
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
11
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
12
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
13
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
14
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
15
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
16
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
17
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

"षडयंत्र रचणाऱ्यांना अजिबात सोडणार नाही"; दिल्लीत स्फोट अन् भूतानमधून पंतप्रधान मोदी गरजले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 14:18 IST

भारत आणि भूतान यांच्यातील मैत्रीचे संबंध आणि भागीदारी मजबूत करण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा २ दिवसीय दौरा आहे.

राजधानी दिल्लीत झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे. या स्फोटात १० हून अधिक लोक मारले गेले. दिल्लीतील प्रसिद्ध लाल किल्ल्याजवळील गजबजलेल्या परिसरात हा स्फोट घडवण्यात आला. या स्फोटामागे जैश ए मोहम्मद कनेक्शन आता समोर येत आहे. त्यातच पंतप्रधान २ दिवसीय भूतान दौऱ्यावर गेले आहेत. ११ आणि १२ नोव्हेंबरला हा दौरा होणार असून त्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र दिल्लीतील स्फोटावरून भूतानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगलेच गरजले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, दिल्लीतील या घटनेने सर्वांचे मन व्यथित आहे. मी पीडित कुटुंबाचे दु:ख जाणतो, आज संपूर्ण देश त्यांच्यासोबत उभा आहे.  दिल्ली स्फोटातील दोषींना कठोर शिक्षा दिली जाईल. या घटनेनंतर मी रात्रभर या घटनेशी जोडलेल्या अधिकाऱ्यांसोबत, यंत्रणेसोबत संपर्कात होतो. घटनेशी निगडित सर्व धागेदोरे जोडले जात आहे. आमच्या तपास यंत्रणा या घटनेच्या मुळाशी जातील. या घटनेमागील षडयंत्रकाऱ्यांना सोडले जाणार नाही असं त्यांनी इशारा दिला.

भारत आणि भूतान यांच्यातील मैत्रीचे संबंध आणि भागीदारी मजबूत करण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा २ दिवसीय दौरा आहे. मागील ११ वर्षात पंतप्रधान मोदी चौथ्यांदा भूतान दौरा करत आहेत. या दौऱ्यात ते विविध कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. यावेळी भूतानचे राजा जिग्मे खेसर नामग्येल वांगचुक यांच्या ७० व्या वाढदिवसाच्या सोहळ्यात ते उपस्थित राहतील. पंतप्रधान मोदी भूतानला १ हजार कोटी आर्थिक सहाय्य देणार आहेत. त्याशिवाय ते ग्लोबल पीस प्रेयर फेस्टिवलमध्येही सहभागी होतील. 

भारतासाठी भूतान का महत्त्वाचे?

हिमालयीन राष्ट्र भूतान हे भारतासाठी धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. केवळ ७,५०,००० लोकसंख्या असलेला हा एक लहान देश असला तरी तो भारत आणि चीनमधील बफर झोन म्हणून काम करतो. भूतानमध्ये चीनचा प्रभाव वाढल्याने भारताच्या चिकन नेकला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे भारत भूतानला सुरक्षा कवच मानतो. २०१७ मध्ये चीनने भूतानच्या डोकलाम प्रदेशात रस्ता बांधण्याचा प्रयत्न केला, परंतु भारताच्या लष्कराने तो रोखला. शिवाय भूतान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी स्थान मिळविण्यासाठी भारताच्या प्रयत्नांना पाठिंबा देतो. 

English
हिंदी सारांश
Web Title : Won't spare conspirators: PM Modi roars from Bhutan after Delhi blast.

Web Summary : Following the Delhi blast near Red Fort, PM Modi, in Bhutan, vowed to punish those responsible. Investigations are underway to uncover the conspiracy. India supports victims and strengthens ties with Bhutan, providing economic assistance and attending key events.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBlastस्फोटdelhiदिल्ली