शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
4
"राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
7
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
8
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
9
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
10
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
11
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
12
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
13
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
14
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
15
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
16
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
17
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
18
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
19
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
20
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...

‘मनरेगा’ची मजुरी  ४०० रुपये करू, महिला बनतील लखपती : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2024 7:32 AM

मध्य प्रदेशातील खरगोन लोकसभा मतदारसंघांतील सेगाव येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना राहुल बोलत होते.

खरगोन (मध्य प्रदेश) : निवडणुकीनंतर केंद्रात आमचे सरकार आल्यास शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल; तसेच ‘मनरेगा’अंतर्गत दिली जाणारी मजुरी २५० रुपयांवरून ४०० रुपये केली जाईल, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सांगितले. 

मध्य प्रदेशातील खरगोन लोकसभा मतदारसंघांतील सेगाव येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना राहुल बोलत होते. काँग्रेसने खरगोन (अनुसूचित जमाती) आणि खांडवा लोकसभा मतदारसंघातून अनुक्रमे पोरलाल खरते आणि नरेंद्र पटेल यांना उमेदवारी दिली आहे. ‘राज्यघटना, आरक्षण, सार्वजनिक क्षेत्रांतील उद्योग व आदिवासींच्या जल, जंगलांवरील हक्कांचे रक्षण करण्यासाठी काँग्रेस ही निवडणूक लढवत आहे. इंडिया आघाडी सत्तेत आल्यास गरीब महिलांना करोडपती बनविण्यासाठी त्यांच्या खात्यात दरवर्षी एक लाख रुपये जमा करणार आहे’, असे ते म्हणाले.   

आरक्षणाची मर्यादा वाढवणारभाजप सत्तेत आल्यास आदिवासी, दलित व इतर मागासवर्गीयांचे आरक्षण हिरावून घेईल. त्यांचे नेते तसे स्पष्टपणे सांगत आहेत. आम्ही कोणाचेही आरक्षण न काढता उलट ते वाढवणार आहोत. न्यायालयाने आरक्षणाची मर्यादा ५० टक्के केली आहे. ही मर्यादा आम्ही हटवू, असे राहुल म्हणाले. मध्य प्रदेशच्या अलीराजपूर जिल्ह्यातील जोबट शहरात एका जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी जातिनिहाय जनगणना आणि आर्थिक सर्वेक्षणाचे समर्थन केले. यातून लोकांची वास्तविक स्थिती समोर येईल आणि देशातील राजकारणाची दिशा बदलेल, असेही ते म्हणाले. 

‘१५० जागाही त्यांना मिळणार नाही’भाजपने राज्यघटना बदलण्याच्या  उद्देशाने ४०० पारची घोषणा दिली आहे. ४०० सोडा त्यांना यावेळी १५० हून अधिक जागा मिळणार नाही, असेही ते म्हणाले. विरोधी आघाडी सत्तेत आल्यास शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा, यासाठी कृषी उत्पादनाची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) सुनिश्चित करण्यासाठी कायदा करेल, असे ते म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४