शहरं
Join us  
Trending Stories
1
"आत्ता कुठे सुरुवात...!" वक्फ कायद्यानंतर पुढे काय? भाजपनं व्हिडिओ शेअर करत स्पष्टच सांगितलं
2
"हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध करता अन् इंग्रजीचे मात्र गोडवे गाता"; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
3
IPL Playoff Scenario: पांड्याच्या MI ला 'चौकार' पुरेसा; धोनीच्या CSK समोर 'सिक्सर' मारण्याचं चॅलेंज
4
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
5
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
6
MI विरुद्धच्या पराभवानंतर MS धोनीनं सांगून टाकला Playoffs च्या पुढचा प्लॅन; म्हणाला...
7
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
8
61 पैशांच्या शेअरवर तुटून पडले लोक, सातत्याने लागतंय अप्पर सर्किट; कंपनी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
9
IPL 2025 : जड्डूच्या 'तलवारबाजी'सह दुबेची फिफ्टी! CSK समोर पुरून उरली MI ची रोहित-सूर्या जोडी!
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी; मोहन भागवतांनी सांगितला जातिवाद मिटवण्याचा मार्ग
11
आता काय बाउंड्री लाइनच्या बाहेर येतोस का? कॅच घेताना सँटनरची कसरत अन् डग आउटमध्ये रोहितची 'धडपड' (VIDEO)
12
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
13
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
14
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
15
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
16
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
17
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
18
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
19
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
20
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?

'400 फीट अंदर गाड देंगे'! विरोधी पक्षातील नेत्याचं PM मोदींसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य; VIDEO व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 14:28 IST

भाजपने त्यांच्या या वक्तव्यासंदर्भात निवडणूक आयोगाकडेही तक्रार केली आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झारखंडमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. JMM नेते नजरुल इस्लाम यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहेत. या वक्तव्यावरून नजरूल यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. याशिवाय, भाजपने त्यांच्या या वक्तव्यासंदर्भात निवडणूक आयोगाकडेही तक्रार केली आहे. 

यानंतर, भाजपने 'I.N.D.I.A.'वर पंतप्रधान मोदींवर जिवघेणा हल्ला करण्याचा कट रचल्याचा आरोपही केला आहे. तसेच, आपण पंतप्रधानांविरोधात कुठल्याही प्रकारचे आक्षेपार्ह विधान केलेले नाही. आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला जात आहे, असे नजरुल इस्लाम यांनी म्हटले आहे.

'आत्म्यात हिटलर, 400 फूट आत गाडून टाकू' -यासंदर्भात पोलिसांनी नजरुल इस्लामविरोधात मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये ते म्हणताना दिसत आहेत की, 'नरेंद्र मोदी यांच्या आत्म्यात आता हळुहळू हिटलर बसताना दिसत आहे. त्याला राज्यघटना बदलायची आहे. आम्ही 400 पार जाऊ, अशी घोषणा त्याने दिली आहे. आज मी तुम्हाला सांगतो, 400 जागा नाही, तर नरेंद्र मोदीला 400 फूट आत गाडले जाईल." यानंतर उपस्थित लोक टाळ्या वाजवतात. मात्र, लोकमत या व्हायरल व्हिडिओची पुष्टी करत नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जीवघेणा हल्ला करण्याचा कट, भाजपचा आरोप - भाजप प्रदेश प्रवक्ता प्रतुल शाहदेव यांनी I.N.D.I.A. वर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जीवघेणा हल्ला करण्याचा कट रचल्याचा आरोप केला आहे. प्रतुल म्हणाले, नजरुल इस्लाम यांचे वक्तव्य सार्वजनिक होऊन 24 तास उलटून गेले आहेत. मात्र अद्यापही पोलिसांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. यावरून सरकार अशा अराजकतावादी घटकांना प्रोत्साहन देत असल्याचे सिद्ध होते.

यापूर्वी, कोडरमा येथे एका आरजेडी नेत्यानेही मोदींसंदर्भात विधान केले होते. या सिक्वेन्स वरून स्पष्ट होते की, I.N.D.IA.चे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काही तरी मोठी घटना घडवून आणण्यासाठी कट रचत आहेत आणि जनतेला भडकवत आहेत.

निवडणूक आयोगाकडे तक्रार -झामुमोच्या केंद्रीय समिती सदस्याच्या वक्तव्यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन देऊन भाजपने नजरुल इस्लाम यांच्या अटकेची मागणी केली आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाJharkhandझारखंड