"आम्ही कुणाला गुलाम बनवलं नाही, आम्ही तर...", काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 16:44 IST2026-01-12T16:43:37+5:302026-01-12T16:44:32+5:30
शिकागो धर्मसभेतील त्यांच्या भाषणाचा संदर्भ देत योगी म्हणाले, "मी गर्वाने सांगतो की, मी हिंदू आहे," असे म्हणणाऱ्या विवेकानंदांनी त्या काळी आत्मभान हरपलेल्या भारताचे प्रतिनिधित्व केले.

"आम्ही कुणाला गुलाम बनवलं नाही, आम्ही तर...", काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
"आम्ही कधीही कुणाला गुलाम बनवले नाही, आम्ही तर नेहमीच मानवतेच्या कल्याणाचा मार्ग स्वीकारला. आमच्याकडे बळ आणि बुद्धी असूनही ना आम्ही कधी त्याचा गैरवापर केला, ना आमचे विचार कुणावरही लादला," असे उत्तर प्रदेशचेमुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. ते लखनऊ येथे स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त 'राष्ट्रीय युवा दिवस' कार्यक्रमात बोलत होते.
योगी म्हणाले, स्वामी विवेकानंद यांनी भारताची सनातन संस्कृती आणि आध्यात्मिक चेतना जागतिक स्तरावर नेण्याचे मोलाचे कार्य केले. शिकागो धर्मसभेतील त्यांच्या भाषणाचा संदर्भ देत योगी म्हणाले, "मी गर्वाने सांगतो की, मी हिंदू आहे," असे म्हणणाऱ्या विवेकानंदांनी त्या काळी आत्मभान हरपलेल्या भारताचे प्रतिनिधित्व केले. मुठभर परकीय आक्रमक भारताला गुलाम बनवण्यात यशस्वी झाले, मुठभर लोक जेव्हा भारतात लुटालुट करत होते, तेव्हा विवेकानंदांनी भारतीय परंपरेचा खरा वारसा जगासमोर मांडला.
आज संपूर्ण जगाचा भारताच्या सामर्थ्यावर विश्वास -
आज जगामध्ये जी उलथापालथ सुरू आहे, त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगाच्या नजरा भारतावर खिळल्या आहेत. "मोदीजी काहीतरी करा," अशी साद जगातील देश घालत आहेत. हा भारताच्या सामर्थ्यावरील विश्वास असून देशाचा तरुण या विश्वासाचे प्रतीक आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
प्रत्येक पंचायत स्थरावर एक मैदान असावे, हे आमचे धेय आहे. मोदी जी म्हणत असतात की, 'खेलोगे तो खिलोगे'. यामुळे तरुण व्यसनाधिनतेपासून दूर राहतात. व्यसनाधीनतेपासून तरुणांना दूर ठेवायचे आहे आणि मादक पदार्थांची विक्रीकरणाऱ्यांना ठेचायचे आहे. यात तरुणांनी सक्रीय सहभाग घ्यावा, असेही योगी म्हणाले.