शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

We are Hiring; भल्याभल्यांना मंदीचा मार, 'ही' कंपनी 9000 पदं भरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 17:33 IST

Coal India Government Job : एग्झिक्युटिव्ह स्तरावरील 4,000 पदांची नियुक्ती

कोलकाता : आर्थिक मंदीचा फटका बसल्यामुळे अनेक बड्या कंपन्यांनी कर्मचारी कपात करण्यास सुरुवात केली आहे. मात्र  एक अशी सरकारी कंपनी आहे की तिने बंपर नोकर भरती करण्याचे नियोजन केले आहे. कोल इंडिया असे या कंपनीचे नाव आहे. ही कंपनी जवळपास 9,000 पदांची नोकर भरती करणार आहे. यामध्ये कंपनी एग्झिक्युटिव्ह स्तरावरील 4,000 पदांची नियुक्ती केली जाणार आहे. 

सरकारी खनिज कंपनी कोल इंडिया आणि या कंपनीच्या सब्सिडियरीजद्वारे होणारी ही भरती गेल्या दहा वर्षांतील सर्वात मोठी आहे. एग्झिक्युटिव्हची नियुक्ती होल्डिंग कंपनीत होत असते. कामगार आणि टेक्निकल नोकरदारांना कंपनीच्या आठ सहाय्यक युनिट्समध्ये नियुक्त केले जाते.

गेल्या 10 वर्षांत कोल इंडिया पहिल्यांदाच इतकी मोठी भरती करत आहे. अनेक वर्षांपासून या जागांवर नोकर भरती करणे बाकी होते. गेल्या वर्षात आम्ही फक्त 1,200 जागांवर नोकर भरती केली होती, असे कोल इंडिया कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने सांगितले. जगभरातील सर्वात मोठी कोळसा उत्पादन कंपनी म्हणून कोल इंडियाला ओखळले जाते. कोल इंडिया कंपनीत 2,80,000 कर्मचारी आहेत. यामध्ये जवळपास 18,000 एग्झिक्युटिव्ह पदावर आहेत.

नियुक्ती केल्या जाणाऱ्या 4,000 कर्माचाऱ्यांमधील ज्युनिअर वर्गातील 900 पदांची नियुक्ती जाहिरात आणि मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. 400 पदांची भरती कॅम्पसद्वारे आणि 100 मेडिकल ऑफिसर आदी पदासांठी नियुक्ती केली जाणार आहे. 75 पदांसाठी नियुक्ती करण्यात आली. याशिवाय, 2,200 अतिरिक्त कर्मचाऱ्यांची निवड स्पर्धात्मक परीक्षेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.   

टॅग्स :jobनोकरीEmployeeकर्मचारीIndiaभारतgovernment jobs updateसरकारी नोकरी