शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

सरसंघचालक हिटलर बनण्याच्या मार्गावर - दिग्विजय सिंह

By admin | Updated: August 18, 2014 14:27 IST

सरसंघचालक मोहन भागवत हिटलर बनण्याच्या मार्गावर आहे अशी टीका काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केली आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १८ -  काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची तुलना हिटलरशी करत त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. 'देशातील एकच व्यक्ती हिटलर बनण्याच्या मार्गावर आहे असे माझे मत होते, मात्र दुसरी व्यक्तीही याच मार्गावर आहे असं आता वाटतयं. देवा, भारताला वाचव!' असे ट्विट करत दिग्विजय सिंह यांनी भागवतांवर टीकास्त्र सोडले. 'हिंदुस्थान हे हिंदूंचेच राष्ट्र आहे,’ या भागवतांच्या वादग्रस्त वक्तव्याचा समाचार घेताना दिग्विजय सिंह यांनी हे ट्विट केले असून 'हिंदुत्व ही धार्मिक ओळख आहे का? सनातन धर्माशी हिंदूत्वाचे नाते काय असा सवाल त्यांनी भागवतांना विचारला आहे. तसेच ' जर एखादी व्यक्ती इस्लाम, ख्रिश्चन, शीख, जैन, बौद्ध यापैकी एखाद्या धर्माला मानणारा असेल, तर ती व्यक्ती पण हिंदूच ठरते का' याबद्दलही भागवत यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही सिंह यांनी केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने निष्पाप लोकांना धर्माच्या नावाखाली फसवून राजकारण करू नये, असा सल्लाही सिंह यांनी भागवतांना दिला आहे.

रविवारी विश्व हिंदू परिषदेच्या सुवर्ण जयंती महोत्सवात भागवत यांनी 'हिंदुस्थान हे हिंदूंचेच राष्ट्र आहे' या वादग्रस्त वक्तव्याचा पुनरुच्चार केला. भागवत पुढे म्हणाले की, हिंदुत्व ही राष्ट्राची ओळख आहे. हिंदू धर्मात इतकी अंगभूत शक्ती आहे की, इतर संप्रदायांनाही तो सामील करून घेऊ शकतो. तसेच अस्पृश्यता संपवल्याशिवाय हिंदूंना गर्वाने हिंदू असल्याचे म्हणता येणार नाही. प्रत्येकाने स्वत:पासून आणि स्वत:च्या घरापासून याची सुरुवात केली, तर येत्या ५ वर्षांत प्रत्येक मंदिर, पाणवठा आणि स्मशान हे सर्व हिंदूंसाठी खुले होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

मोहन भागवत यांच्या या विधानावर पूर्वीही देशभरात टीका झाली होती, मात्र तरीही भागवत आपल्या विधानावर ठाम आहेत.