शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

मुस्लीम संघटनेची घोषणा; वारिस पठाणांचं शिर कलम करणाऱ्याला 11 लाखांचे बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 11:25 AM

पठाण यांचे पोस्टर घेऊन रॅली काढण्यात आली. यावेळी पठाण यांच्या फोटोवर चप्पल मारण्यात आले. हैदराबाद आणि महाराष्ट्र या राज्यानंतर बिहार एमआयएमचे अस्तित्व आहे. 

नवी दिल्ली : एमआयएमचे नेते आणि राष्ट्रीय प्रवक्ते वारिस पठाण यांनी गुरुवारी नागरिकता संशोधन कायदा आणि एनआरसीच्या विरोधात घेतलेल्या सभेत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचे पडसाद देशातील अनेक भागात उमटले आहे. आता तर पठाण यांच्या विरोधात मुस्लीम संघटनाही आक्रमक झाल्या असून पठाण यांचे शिर कलम करणाऱ्याला या संघटनेकडून बक्षीस जाहीर कऱण्यात आले आहे. 

वारिस पठाण यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ शुक्रवारी बिहारमधील मुजफ्फरपूर येथे हिंदू आणि मुस्लीम संघटनांनी आंदोलन केले. पठाण यांच्या वक्तव्यावर अनेक मुस्लीम संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर मुजफ्फरपूर येथील अल्पसंख्यांक सामाजिक संघटनेने वारिस पठाण यांचे शीर कलम करणाऱ्याला 11 लाख रुपयांचे बक्षीस ठेवले आहे. एक-ए-हिंदुस्थान मोर्चा नावाच्या सामाजिक संघटनेचे संयोजक तमन्ना हाशमी यांनी पठाण यांचे वक्तव्य देशविरोधी असल्याचे म्हटले आहे. 

तत्पूर्वी पठाण यांचे पोस्टर घेऊन रॅली काढण्यात आली. यावेळी पठाण यांच्या फोटोवर चप्पल मारण्यात आले. हैदराबाद आणि महाराष्ट्र या राज्यनंतर बिहार एकमेव असं राज्य आहे जिथे असुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमचे अस्तित्व आहे. 

आपल्याला स्वातंत्र्य मिळवावं लागेल. जी गोष्ट मागून मिळत नसेल, ती हिसकावून घ्यावी लागेल. आता ती वेळ आलेली आहे. आम्ही माता, भगिनींना पुढे करतो, असं ते म्हणतात. आता तर फक्त सिंहिणी बाहेर पडल्या आहेत आणि तरीही तुम्हाला घाम फुटला आहे. आम्हीदेखील त्यांच्या सोबत बाहेर पडलो, तर काय होईल याचा विचार करा. आम्ही १५ कोटी आहोत. मात्र १०० कोटींवर भारी पडू शकतो, ही गोष्ट लक्षात ठेवा,' असं वादग्रस्त विधान वारिस पठाण यांनी केलं आहे.