शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

अपुरा निधी व जागेच्या कमतरतेमुळे वर्धा-नांदेड-यवतमाळ रेल्वेमार्गास विलंब

By admin | Updated: December 6, 2014 00:14 IST

अपुरा निधी व जागेच्या कमतरतेमुळे वर्धा-नांदेड- यवतमाळ रेल्वे मार्गाला विलंब होत असल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी दिली.

नवी दिल्ली : अपुरा निधी व जागेच्या कमतरतेमुळे वर्धा-नांदेड- यवतमाळ रेल्वे मार्गाला विलंब होत असल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी दिली. ते म्हणाले, २८४ किलोमीटरच्या या मार्गावरील ३४ किलोमीटर भूमी अधिग्रहीत केली असून, सध्या वर्धा- यवतमाळ पट्ट्यातील पुलांची कामे सुरू झाली आहेत. खा. विजय दर्डा यांनी राज्यसभेत शुक्रवारी, वर्धा-नांदेड- यवतमाळ रेल्वे मार्गाच्या प्रगतीसोबतच मार्ग केव्हा पूर्ण होईल असा प्रश्न विचारला होता. रेल्वे राज्यमंत्री सिन्हा उत्तरात म्हणाले, की या मार्गाची अधिकृत घोषणा २००८ च्या रेल्वे अर्थसंकल्पात केली होती. वर्धा- नांदेड- यवतमाळ -पुसद या नव्या मार्गाचे काम रेल्वे राज्य सरकारच्या ६०-४० टक्के भागीदारीत २००८-२००९ मध्ये सुरू झाले. ६९७ कोटी रूपयांच्या आराखड्याला मान्यता दिली होती. प्रत्यक्षात मात्र, मार्च २०१४ पर्यंत ६७ कोटी रूपये खर्च करण्यात आले. २०१४-१५ यावर्षात १५ कोटींची तरतूद करण्यात आली. निधीच्या कमतरतेसोबतच जागा उपलब्ध नसल्याने वर्धा-नांदेड- यवतमाळ रेल्वे मार्गाला विलंब होत असून, या योजनेचा सध्याचा अपेक्षित खर्च २५०० कोटी आहे. जागेच्या दरात मोठी वाढ झाल्याने भूमीसंपादनाचा मोठा खर्च येत आहे, असे सांगून सिन्हा यांनी स्पष्ट केले, कमतरतेअभावी सर्व योजनांना नियमित आधारावर पुरेसा निधी देणे शक्य होणार नाही. त्यामुळÞे या योजनेच्याही कालबध्दतेसाठी सध्याच अंदाज व्यक्त करणे शक्य नाही. (विशेष प्रतिनिधी)

अपेक्षित खर्चात वाढ : दर्डा यांच्या प्रश्नावर रेल्वे राज्यमंत्र्यांचे उत्तर