शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
5
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
6
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
7
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
8
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
9
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
11
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
12
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
13
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
14
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
15
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
16
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
17
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
18
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
19
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
20
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग-६ -जरीपटका -२

By admin | Updated: January 29, 2015 23:17 IST

बॉक्स..

बॉक्स..

अरुंद गल्ल्या, पथदिवे नाही

जुना जरीपटका माता मंदिर आणि राष्ट्रीय झेंडा परिसरात रस्त्याच्या नावावर केवळ अरुंद गल्ल्या आहेत. पथदिवे जवळपास नाहीच. एक दोन पथदिवे मुख्य रस्त्याच्या बाजूला लावले आहेत. मात्र ते बंद असतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी विशेषत: महिलंना त्रास होतो.
बॉक्स..
साफसफाईची बोंब
जरीपटका प्रभागात जरीपटका मुख्य बाजारपेठेचा भाग असो की, जुना जरीपटका, दयालू सोसायटी असो की, बँक कॉलनी सर्वत्रच साफसफाईची बोंंब आहे. जरीपटक्यातील मुख्य बाजारात तर कचऱ्याचे ढीग साचलेले असतात. त्यावरच जनावरांचा मुक्त संचार असतो. जुना जरीपटका भागात तर साफसफाई करणारे फिरकतच नाहीत. त्यामुळे सर्वत्रच अस्वच्छतेचे वातावरण असते.
बॉक्स..
अतिक्रमणाचा विळखा
जरीपटका प्रभागातील मुख्य बाजार परिसर हा विकसित भाग समजला जातो. येथील नागरिकांचा व्यापार व राहणे दोन्ही एकाच ठिकाणी आहे. त्यामुळे बहुतांश व्यापारी वर्गाचा हा भाग असून येथील नागरिक अतिक्रमणामुळे त्रस्त झाले आहे. मोठमोठ्या इमारतींनी रस्त्यावरच अतिक्रमण करून ठेवले आहेत. खासगी सामान रस्त्यावरच ठेवण्यात आले आहेत. एखाद्या गरीबांचे साधे अतिक्रमण असेल तर ते लगेच तोडले जाते परंतु श्रीमतांचे अतिक्रमण कोण तोडणार, असा प्रश्न येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. अतिक्रमणामुळे रस्त्यांना गल्लीचे स्वरूप आले असून गल्ल्या जवळपास नष्ट झाल्या आहेत. जरीपटका चौधरी चौक परिसरातील दोन मोकळे मैदान सुद्धा अतिक्रमणाने गिळंकृत केली आहेत.
बॉक्स..
नळ आहेत तरी पाण्याची टंचाई
जुना जरीपटका भागात नळ आहेत. परंतु अतिशय खोलवर नळाची पाईपलाईन आहे. त्यामुळे महिलांना पाणी भरायला खूप त्रास होतो. दाबाने पाणी येत नाही. माता मंदिर परिसरात सार्वजनिक नळ आहेत. मात्र नळ येण्याची कुठलीही वेळ निश्चित नाही. त्यामुळे नळ असूनही पाण्याची टंचाई कायम आहे.

बॉक्स..
बोअरवेल-टँकरचा आधार

जरीपटका मुख्य बाजार परिसरात नळाची लाईन आलेली आहे. मात्र त्याला पाणीच नाही. प्रत्येक घरात बोअरवेल आहे. त्यामुळे या बोअरवेलचाच येथील नागरिकांना आधार आहे. नळाला पाणी नसल्याने आणि काहींच्या घरी बोअरवेल नसलेल्यांना टँकरची प्रतीक्षा करावी लागते. दर दोन दिवसांनी टँकर येतो. त्यामुळे बोअरवेल आणि टँकरच्या भरवशावर येथील नागरिकांना राहावे लागत आहे.