"मला जेलमध्ये टाका, पण माझ्या १० महिन्यांच्या बाळाला वाचवा"; १६ कोटींच्या इंजेक्शनसाठी बापाची आर्त हाक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 05:47 PM2021-08-21T17:47:44+5:302021-08-21T17:53:37+5:30

16 Crore Rupees Injection : स्पायनल मस्क्युलर अट्रॉफी नावाच्या आजारासाठी १० महिन्यांच्या अयांशला हवंय १६ कोटींचं इंजेक्शन. बाळाच्या वडिलांचा व्हिडीओ होतोय व्हायरल.

viral video father help 10 months old baby ayansh suffering rare disease sma 16 crore injection | "मला जेलमध्ये टाका, पण माझ्या १० महिन्यांच्या बाळाला वाचवा"; १६ कोटींच्या इंजेक्शनसाठी बापाची आर्त हाक

"मला जेलमध्ये टाका, पण माझ्या १० महिन्यांच्या बाळाला वाचवा"; १६ कोटींच्या इंजेक्शनसाठी बापाची आर्त हाक

Next
ठळक मुद्देस्पायनल मस्क्युलर अट्रॉफी नावाच्या आजारासाठी १० महिन्यांच्या अयांशला हवंय १६ कोटींचं इंजेक्शन.बाळाच्या वडिलांचा व्हिडीओ होतोय व्हायरल.

स्पायनल मस्क्युलर अट्रॉफी नावाच्या आजाराचा सामना करत असलेल्या १० महिन्यांच्या अयांश या चिमुकल्याला १६ कोटी रूपयांच्या इंजेक्शनची गरज आहे. अयांशचे वडिल अलोक कुमार सिंह यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये ते आपल्या चिमुकल्याला वाचवण्यासाठी लोकांकडे मदत मागताना दिसत आहेत. तसंच १० वर्षांपूर्वी आपल्या भावाकडून जी चूक झाली त्याची शिक्षा आपल्या मुलाला देऊ नये. कोणतीही अफवा पसरवू नये, असं आवाहनही ते करताना दिसत आहेत.

"माझी तुमच्याकडे हात जोडून प्रार्थना आहे, मुलं देवाचं रुप असतात. तुमच्या घरातही मुलं असतील. मुलाप्रती कोणतीही निराळी भावना ठेवू नका. त्याचा जीव वाचवा. माझं नाव अलोक कुमार सिंह आहे आणि माझ्या मुलाचं नाव अयांश आहे. तो एका गंभीर आजारानं त्रस्त आहे. त्याला वाचवण्यासाठी १६ कोटी रूपयांच्या इंजेक्शनची गरज आहे. मी आणि माझी पत्नी दिवसरात्र त्याला वाचवण्यासाठी लोकांकडे मदत मागत आहो. काही लोकं आमच्याविरोधात अफवा पसवत आहेत. माझ्या भावाचं रांचीमध्ये एक इन्स्टीट्यूट होतं जे २०१२ मध्ये बंद झालं त्यात मीदेखील भागीदार होतो असं म्हणत आहेत," असं अयांशचे वडील व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहेत.

"इन्स्टीट्यूट बंद झाल्यानंतर २०१४ मध्ये माझं लग्न झालं. माझी आणखी एक मुलगी आहे जिची प्रकृती चांगली आहे. माझ्या एका मुलाचा २०१७ मध्ये जन्म झाला होता. परंतु अशाच आजारामुळे त्याला आम्हाला गमवावं लागलं. अयांशचा सप्टेंबर २०२० मध्ये जन्म झाला. त्याला SMA Type 1 हा आजार आहे. ज्याला आम्ही वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत," असंही ते म्हणाले. 

१० महिन्यांच्या बाळाला शिक्षा नको
"आठ वर्षांपूर्वीच मी माझ्या भावापासून वेगळा झालो. माझ्या भावानं काही चुकीचं केलं किंवा माझ्याकडून काही चूक झाली तर त्याची शिक्षा १० महिन्यांच्या अयांशला का. जर तुम्ही बाळाला वाचवू शकत नसाल तर चुकीची माहिती तरी पसरवू नका. मी माझ्या बाळाच्या आयुष्याची भीक मागत आहे. सरकार किंवा लोकांच्या नजरेत मी चुकीचा असेन तर मला तुरूंगात टाका पण माझ्या बाळाचा जीव वाचवा," असंही ते म्हणत आहेत.

... तर रस्त्यावर का बसलो असतो?
"जर माझ्याकडे भरपूर पैसे असते तर मी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दरबारात का गेलो असतो आणि माझ्या मुलाच्या आयुष्याची भीक का मागितली असती. जो बाप आपल्या मुलासाठी मुख्यमंत्र्यांपासून पंतप्रधान, राज्यपाल, राष्ट्रपती या सर्वांकडे मदत मागत आहे त्याची स्थिती तुम्ही समजू शकता. ज्यांना माझ्या खात्याची माहिती हवी आहे त्यांनी एकदा माझ्या घरी यावं त्यांना सर्व माहिती देऊ. सर्व माध्यमं दाखवत आहेत. फेसबुकच्या माध्यमातून मी सातत्यानं अपडेट देत आहे. माझ्या मुलाचा चेहरा पाहा, आमची स्थिती पाहा. त्याचा जीव वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत," असंही अलोक म्हणाले. 

सध्या मदत बंद
दरम्यान, नितीश कुमार यांनीदेखील लोकांना अयांशला वाचवण्यासाठी मदत करण्याचं आवाहन केलं आहे. ज्यावेळी त्यांच्या मुलाबाबत माध्यमात आलं त्यावेळी लोकांनी मदत करण्यास सुरूवात केली. परंतु गेल्या काही दिवसांपासून मदत पूर्णपणे बंद आहे. यामुळे कुटुंबीय चिंताग्रस्त असल्याचं त्यांनी आजतकशी बोलताना सांगितलं. सध्या त्यांच्याकडे एकूण ६.७२ कोटी रूपयांची रक्कम जमली आहे. परंतु अजूनही १० कोटींची आवश्यकता आहे. आपण मुख्यमंत्र्यांकडेही मदत मागितली परंतु यश आलं नसल्याचं ते म्हणाले. 

अयांशच्या आई-वडिलांनी आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही मदतीसाठी ईमेल केला आहे. तसंच मुख्यमंत्री नितीश कुमार, राज्यपाल फागू चौहान आणि आरोग्यमंत्री मंगल पांडे यांनाही पुन्हा मदतीसाठी पत्र लिहिलं आहे.

Web Title: viral video father help 10 months old baby ayansh suffering rare disease sma 16 crore injection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app