Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 19:20 IST2025-06-10T19:19:20+5:302025-06-10T19:20:49+5:30

एका विवाहित महिलेने आपला पती मावशीसोबत पळून गेल्याचा आरोप केला आहे. पीडित पत्नी आता तीन लहान मुलांसह न्याय मिळवण्यासाठी एसपी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहे.

Viral News: Son-in-law ran away with mother-in-law, wife reached the police station with three children! She said... | Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...

Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...

गोंडा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी राहणाऱ्या एका विवाहित महिलेने आपला पती मावशीसोबत पळून गेल्याचा आरोप केला आहे. पीडित पत्नी आता तीन लहान मुलांसह न्याय मिळवण्यासाठी एसपी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहे.

ही घटना गोंडाच्या नवाबगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पीडित महिलेने सांगितले की, तिचे आणि पती इरफानचे लग्न १ नोव्हेंबर २०१७ रोजी मुस्लिम रीतिरिवाजानुसार झाले होते. लग्नानंतर दोघांना एक मुलगा आणि दोन मुली झाल्या आणि त्यांचा संसार सुरू झाला. काही काळानंतर पती-पत्नी लखनौला स्थलांतरित झाले, जिथे इरफान ऑटो चालवत होता, तर त्यांचे कुटुंब एका भाड्याच्या खोलीत राहत होती.

मावशीचं वारंवार येणं आणि नातेसंबंधांची सुरुवात
पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, २०१८ मध्ये तिच्या खरगुपूरमधील मावशीचा पती निधन पावला. त्यानंतर मावशी लखनौमध्ये त्यांच्या घरी वारंवार येऊ लागली. सुरुवातीला तिला मावशीवर दया वाटत होती. मात्र, नंतर तिला पती आणि मावशीमध्ये अनैतिक संबंध सुरू झाल्याचा संशय येऊ लागला.

चार वर्षांपासून चालू होते संबंध
महिलेने असा आरोप केला की, तिच्या पतीचे आणि विधवा मावशीचे गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. सहा महिन्यांपूर्वी, जेव्हा तिने या नात्याचा विरोध केला, तेव्हा पती इरफान आणि तिची मावशी दोघेही पळून गेले. त्यानंतर महिलेने लखनौच्या ठाकुरगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पण, पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नाही.

न्यायासाठी एसपी कार्यालयात धाव
पती व त्याची मावशी सासू अर्थात पत्नीची मावशी सध्या गोंडाच्या खरगुपूर आणि तिच्या माहेरी धानेपूर येथे लपून राहत असल्याचा संशय असून, पीडित पत्नीने तिथेही तक्रार केली. मात्र, अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. शेवटी, तिने थेट गोंडा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर राहून न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.

Web Title: Viral News: Son-in-law ran away with mother-in-law, wife reached the police station with three children! She said...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.