शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

बाबा रामपाल यांच्या आश्रमासमोर हिंसक संघर्ष

By admin | Updated: November 19, 2014 00:15 IST

या समर्थकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला, अश्रुधुराचे नळकांडे फोडले़ या धुमश्चक्रीत पोलीस, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसह शंभरावर लोक जखमी झालेत़

बरवाला (हिसार) : हरियाणाच्या हिसार जिल्ह्णातील बरवाला नगर येथील स्वयंभू आध्यात्मिक गुरूबाबा रामपाल यांच्या सतलोक आश्रमाबाहेर आज मंगळवारी हिंसक संघर्ष उडाला़ रामपाल यांना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर बाबांच्या समर्थकांनी गोळीबार व दगडफेक केली़ या समर्थकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला, अश्रुधुराचे नळकांडे फोडले़ या धुमश्चक्रीत पोलीस, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसह शंभरावर लोक जखमी झालेत़ नवी दिल्लीतही या घटनेचे पडसाद उमटले़ अनेक रामपाल समर्थकांनी येथील जंतरमंतरवर निदर्शने करीत हरियाणातील बाबा रामपाल यांच्या आश्रमाबाहेरील पोलिसांना हटविण्याची मागणी केली़ रामपाल यांच्यावरील आरोप खोटे असल्याचे सांगत या निदर्शकांनी जोरदार घोषणाबाजी केली़पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने सोमवारी रामपाल यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करीत शुक्रवारपर्यंत त्यांना न्यायालयासमक्ष हजर करण्याचे आदेश दिले होते़ मंगळवारी पोलीस रामपाल यांना अटक करण्यासाठी आश्रमात पोहोचले़ मात्र रामपाल समर्थकांनी त्यांना रोखले़ यामुळे तणाव वाढला़ पोलीस अधिकाऱ्यांनी आश्रमाची ५० फूट उंच कुंपणाची भिंत तोडण्याचे प्रयत्न करताच आश्रमातील रामपाल समर्थकांनी एका जेसीबी मशिनीला आग लावली़ संध्याकाळ होताच, अधिकाऱ्यांनी आपली मोहीम काही काळ थांबवत आश्रमातील समर्थकांना बाहेर येण्याची सवलत दिली़ जेणेकरून न्यायालयाचा आदेश पाळत रामपाल यांना अटक केली जाऊ शकते़ आश्रमात उपस्थित समर्थकांकडून गोळीबार आणि दगडफेक झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे़ पोलिसांनी आश्रमात शिरण्याचे प्रयत्न करताच बाबा रामपाल यांचे समर्थक त्यांच्यावर तुटून पडले आणि आक्रमक होत पोलिसांवर गोळीबार आणि दगडफेक सुरू केली़ आश्रमात हजारो समर्थक हजर असल्याचे सांगण्यात येत आहे़ एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोलीस जीवित हानी रोखण्यासाठी संयम बाळगून आहेत़ (वृत्तसंस्था)