शहरं
Join us  
Trending Stories
1
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
2
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
3
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
4
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाची पहिली महिला पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
5
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
6
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
7
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
8
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
9
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
10
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
11
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
12
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
13
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
14
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
15
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
16
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
17
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
18
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
19
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
20
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनच्या काळात गावकऱ्यांची कमाल; 'द व्हिजिटेबल फार्मिंग चॅलेंज'चं होतंय कौतुक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 13:35 IST

या गावात लोक अगोदर छोटे गट करून फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत आपापल्या घरांजवळील मोकळ्या जागा स्वच्छ करू लागले.

एकीकडे कोरोनामुळे जगभरातील अनेकजण घरात बंदिस्त असल्याचे पाहाला मिळाले. तर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या डॉकडाऊनमध्ये मिळालेल्या वेळेचे अनेकांनी सदुपयोग केल्याचे निदर्शनास आले.लॉकडाऊनच्या काळात सोशल डिस्टंसिंग नियमांचे पालन करत अर्नाकुलम जिल्ह्यातील वडक्ककेरा पंचायतीने ठरवले की, गावात कुणीच रिकामे बसणार नाही. त्यानुसार, आपापल्या घरांजवळील मोकळ्या जागा स्वच्छ करू लागले. नंतर मोकळ्या जागेत मशागत करून पेरणी केली आणि हिरव्यागार भाज्यांचे पीक घतले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला नवीन गती मिळवून देईल असे म्हटले आहे. त्याच पार्श्वभूमीवर हा छोटासा प्रयत्न असला तरीही एक उत्तम उदाहरण आज या गावकऱ्यांनी सर्वांसमोर ठेवले आहे. 

घराच्या दारापुढे अंगण, अंगणात तुळस आणि सोबतीला इतर झाडे अशी संस्कृती ग्रामीण भागात पाहायला मिळते. शहरी भागातून लोप पावत जाणारी हीच अंगण संस्कृती आजही गावक-यांनी जपली आहे. म्हणूनच गावातील मोकळ्या जागा, घरांजवळ तसेच छतांवरही  भाज्या लावायचे गावक-यांनी ठरवले. विशेष म्हणजे यात खते वापरायची नाहीत, असेही ठरले. या मोहिमेला 'द व्हिजिटेबल फार्मिंग चॅलेंज' असे नाव देण्यात आले. ७० दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये हे लोक भाज्यांबाबत स्वावलंबी झाले आहेत. सामूहिक प्रयत्नांतून भाज्यांचे हे उत्पादन इतके झाले की केरळ सरकारच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी मदत सुरू केली. या गावात लोक अगोदर छोटे गट करून फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत आपापल्या घरांजवळील मोकळ्या जागा स्वच्छ करू लागले. नंतर त्या जागेची मशागत केली. ग्रामपंचायतीने वेगवेगळ्या प्रकारच्या बियांची २० हजार पाकिटे मोफत दिली.

आज येथे प्रत्येक घरात भेंडी, वांगी, भोपळे, टोमॅटो इत्यादी भाज्या डोलू लागल्या आहेत. याच माध्यमातून आपल्या घराबाहेर निसर्ग संवर्धनाचा अनोखा उपक्रमही गावात राबवला  जात आहे. अशा प्रकारे भाज्यांची लागवड केल्यामुळे त्यांच्याही कुटुंबाचा  घरखर्चही निघाला आणि इतरांनाही भाज्या उपलब्ध झाल्यामुळे अनेकांच्या गरजाही पूर्ण झाल्या.