विलास डांगरे

By Admin | Updated: December 28, 2014 23:40 IST2014-12-28T23:40:37+5:302014-12-28T23:40:37+5:30

विलास डांगरे अत्यवस्थ

Vilas Dangre | विलास डांगरे

विलास डांगरे

लास डांगरे अत्यवस्थ

नागपूर : उपराजधानीतील प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. विलास डांगरे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे शहरातील एका रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांना श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास होत होता व त्यांचा रक्तदाबदेखील अचानकपणे कमी झाला होता. त्यांच्यावर रविवारी दिवसभर उपचार करण्यात आले. दुपारनंतर त्यांच्या प्रकृतीत काही प्रमाणात सुधारणा झाली. ते अत्यवस्थ असल्याची बातमी कळताच केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शहरातील मान्यवरांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Vilas Dangre