video: धावत्या गाडीवर करू लागला व्यायाम; नंतर जे झालं, ते पाहून धक्का बसेल...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 07:07 PM2022-07-18T19:07:31+5:302022-07-18T19:08:32+5:30

सोशल मीडियावर दररोज स्टंटचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. पण, कधीकधी हा स्टंट एखाद्याच्या जीवावर बेतू शकतो.

video: man was doing exercise on running garbage truck; fall from truck and got injured | video: धावत्या गाडीवर करू लागला व्यायाम; नंतर जे झालं, ते पाहून धक्का बसेल...

video: धावत्या गाडीवर करू लागला व्यायाम; नंतर जे झालं, ते पाहून धक्का बसेल...

Next


लखनौ: सोशल मीडियावर दररोज स्टंटचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. पण, कधीकधी हा स्टंट एखाद्याच्या जीवावर बेतू शकतो. उत्तर प्रदेशात अशाच प्रकारची एक घटना घडली आहे. एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने नुकताच सोशल मीडियावर एका व्यक्तीचा कचऱ्याच्या ट्रकवर पुश-अप करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. 


विशेष म्हणजे, हा व्यक्ती चक्क धावत्या कचऱ्याच्या ट्रकवर पुश-अप करतोय. हा व्हिडिओ पाहून नेटकरीदेखील थक्क झाले. मात्र, व्हिडिओमध्ये पुढे जे घडले, ते पाहून सर्वांनाच धक्का बसला. पुश-अप केल्यानंतर हा व्यक्ती त्या धावत्या ट्रकवर उभा राहतो, पण काही सेकंदानंतर तो तोल जाऊन खाली पडतो. व्हिडिओमध्ये शेवटी त्या व्यक्तीच्या अंगावर लागलेल्या जखमा दाखवण्यात आल्या आहेत.

लखनौच्या अतिरिक्त पोलिस उपायुक्त श्वेता श्रीवास्तव यांनी व्हिडिओ शेअर करताना लिहिले की, गंभीर दुखापतीमुळे आता हा जखमी व्यक्ती काही दिवस बसूही शकणार नाही. याशिवाय, त्यांनी लोकांना समजूतदार होण्याचे आवाहन केले. या व्हिडिओवर नेटिझन्सनी प्रतिक्रिया दिल्या. एकाने त्या व्यक्तीबद्दल वाईट वाटत असल्याचे म्हटले तर दुसऱ्याने पोलिस विभागाला त्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. 

Web Title: video: man was doing exercise on running garbage truck; fall from truck and got injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.