Video : धक्कादायक! VIP ताफ्यासाठी पोलिसांनी थांबवली रुग्णवाहिका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 05:27 PM2020-04-27T17:27:21+5:302020-04-27T17:30:57+5:30

रुग्णांवर वेळेत योग्य उपचार केले जावेत यासाठी वैद्यकिय क्षेत्रातील लोक खूप काम करत आहेत. मात्र चेन्नईमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

video chennai police stops ambulance to allow vip convoy to pass watch the SSS | Video : धक्कादायक! VIP ताफ्यासाठी पोलिसांनी थांबवली रुग्णवाहिका

Video : धक्कादायक! VIP ताफ्यासाठी पोलिसांनी थांबवली रुग्णवाहिका

Next

चेन्नई - कोरोना व्हायरसच्या सामना करण्यासाठी देश सज्ज झालेला असतानाच देशातील रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 27,000 हून अधिक  झाली आहे. संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्यानंतर मोदी यांनी देशभरात ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली. कोरोनाशी लढण्यासाठी पोलीस देखील अहोरात्र काम करत आहेत. वेळप्रसंगी ते स्वत:चा जीव धोक्यात घालून सर्वसामान्यांची मदत करत आहेत. मात्र याचदरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे.

रुग्णांवर वेळेत योग्य उपचार केले जावेत यासाठी वैद्यकिय क्षेत्रातील लोक खूप काम करत आहेत. मात्र चेन्नईमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. व्हीआयपी ताफ्याला रस्ता देण्यासाठी चेन्नईतील पोलिसांनी रुग्णवाहिका थांबवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने या घटनेचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. रुग्णवाहिकेसोबतच रस्त्यावर अनेक गाड्या आणि प्रवासी उभे असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नई पोलिसांनी व्हीआयपी ताफा जात असल्याने रुग्णवाहिका आणि इतर प्रवाशांना थांबवलं. आयलँड ग्राऊंडच्या सर्कलजवळ ही घटना घडली. रुग्णवाहिका आणि इतर लोक बराच वेळ उभे असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. रुग्णवाहिकेत रुग्ण होता की ती रिकामी होती याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे. तसेच व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी पोलिसांवर टीका केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

Coronavirus : भारीच! फक्त चेहरा पाहून कोरोनाची माहिती मिळणार, 'हे' उपकरण फायदेशीर ठरणार

Coronavirus : 'मी जिवंत आहे', डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या रुग्णाचा धक्कादायक Video

Coronavirus : 'लॉकडाऊनमध्ये आमच्या शिक्षिका क्लास घेतात', 5 वर्षांच्या चिमुकल्याची थेट पोलिसांकडे तक्रार

Coronavirus : लॉकडाऊनमध्ये WhatsApp ओपन न करता कोण, कधी ऑनलाईन आहे हे असं जाणून घ्या

 

Web Title: video chennai police stops ambulance to allow vip convoy to pass watch the SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.