शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

वंदे भारतचे जेवण की...? रांचीच्या महिलेचे ओठ सुजले, २ वर्षांच्या मुलाला डायरिया; IRCTC च्या दाव्यावर प्रवाशाचा संतप्त सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 13:22 IST

Vande Bharat Express Food Complaint : वंदे भारत एक्सप्रेसमध्ये निकृष्ट जेवणामुळे रांचीच्या आयुषी सिंह यांना गंभीर ॲलर्जी झाली असून त्यांच्या २ वर्षांच्या मुलाला डायरिया झाला आहे. IRCTC ने यावर काय स्पष्टीकरण दिले? वाचा सविस्तर.

देशातील सर्वात आधुनिक आणि हाय-स्पीड 'वंदे भारत एक्सप्रेस' पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. रांची येथील एक महिला प्रवासी आणि त्यांच्या २ वर्षांच्या चिमुरड्याला ट्रेनमधील जेवण खाल्ल्यानंतर गंभीर प्रकृती स्वास्थ्याचा सामना करावा लागला आहे. सोशल मीडियावर पीडित महिलेने शेअर केलेले फोटो आणि डॉक्टरांची चिठ्ठी पाहून रेल्वे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

नेमकी घटना काय?
रांची येथील रहिवासी आयुषी सिंह २७ मार्च रोजी ट्रेन नंबर २२५०० (वंदे भारत) च्या कोच E1 मधून प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान त्यांनी ट्रेनमध्ये दिलेले जेवण घेतले. आयुषी यांचा आरोप आहे की, जेवण खाल्ल्यानंतर काही वेळातच त्यांना तीव्र ॲलर्जी झाली, ज्यामुळे त्यांचे ओठ सुजले. इतकेच नाही तर त्यांच्या अवघ्या २ वर्षांच्या मुलाला डायरिया झाला. काही दिवसांपूर्वीच रेल्वेच्या ट्रेनमध्ये दह्याच्या पाकिटात अळ्या सापडल्या होत्या. यानंतर आता हा प्रकार समोर आला आहे.

फोटो आणि पुरावे आले समोर
आयुषी यांनी सोशल मीडियावर आपल्या सुजलेल्या ओठांचे फोटो आणि डॉक्टरांनी दिलेली मेडिकल स्लिप शेअर केली आहे. "वेळेवर उपचार मिळाले नसते तर प्रकृती अधिक बिघडली असती," असा दावा त्यांनी केला आहे. अन्नाच्या दर्जासोबतच त्यांनी ट्रेनमध्ये मिळणाऱ्या पाण्याच्या चवीवरही शंका उपस्थित केली असून साफसफाईबाबत प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

IRCTC ची सफाई: 'सगळं काही ठीक होतं'
या प्रकरणावर रेल्वेची कॅटरिंग संस्था IRCTC ने स्पष्टीकरण दिले आहे. रेल्वेच्या मते, "त्या दिवशी पुरवण्यात आलेल्या अन्नाची तपासणी केली असता ते समाधानकारक आढळले. इतर कोणत्याही प्रवाशाने अन्नाबाबत तक्रार केली नाही." मात्र, IRCTC च्या या उत्तरावर आयुषी समाधानी नाहीत. "इतरांना त्रास झाला नसेल, पण मला आणि माझ्या मुलाला याचा फटका बसला आहे," असे त्यांनी ठणकावून सांगितले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Vande Bharat Meal: Poison? Woman's Lips Swell, Child Gets Diarrhea.

Web Summary : A woman and her child suffered health issues after eating a Vande Bharat Express meal. The woman experienced severe allergies, while her child developed diarrhea. Despite IRCTC's claim that the food was satisfactory, the passenger insists it caused harm.
टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसIndian Railwayभारतीय रेल्वे