उत्तर भारतात गोठविणारी थंडी दिल्लीत पारा २़६ अंश से़वर

By Admin | Updated: December 28, 2014 23:40 IST2014-12-28T23:40:36+5:302014-12-28T23:40:36+5:30

नवी दिल्ली : संपूर्ण उत्तर भारत रविवारी थंडीने गारठला़ उत्तर प्रदेशात गत २४ तासांत दाट धुक्यांमुळे झालेल्या अपघात दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे़ राजधानी दिल्लीत आज गत पाच वर्षांतील सर्वात नीचांकी २़६ अंश सेल्सिअस तामपानाची नोंद झाली़ बोचरी थंडी आणि दाट धुके यामुळे रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतूक विस्कळीत झाली़

Uttar Pradesh, which is freezing cold in north India, has a mercury of 2-6 degrees Celsius | उत्तर भारतात गोठविणारी थंडी दिल्लीत पारा २़६ अंश से़वर

उत्तर भारतात गोठविणारी थंडी दिल्लीत पारा २़६ अंश से़वर

ी दिल्ली : संपूर्ण उत्तर भारत रविवारी थंडीने गारठला़ उत्तर प्रदेशात गत २४ तासांत दाट धुक्यांमुळे झालेल्या अपघात दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे़ राजधानी दिल्लीत आज गत पाच वर्षांतील सर्वात नीचांकी २़६ अंश सेल्सिअस तामपानाची नोंद झाली़ बोचरी थंडी आणि दाट धुके यामुळे रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतूक विस्कळीत झाली़
दिल्ली विमानतळावर ५५ उड्डाणांचा खोळंबा झाला़ तीन आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा मार्ग बदलण्यात आला़ या भागांतील ८० पेक्षा रेल्वेगाड्याही यामुळे विलंबाने धावत आहेत़ हवामान विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, दिल्लीत आज गत पाच वर्षांतील सर्वाधिक कमी तापमान नोंदवले गेले़ गत एक दशकातील हे सर्वात नीचांकी तापमान मानले जात आहे़ तथापि, याबाबत अधिकृत आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नाही़ दिल्लीत यापूर्वी २६ डिसेंबर १९४५ रोजी आतापर्यंतचे सर्वाधिक नीचांकी १़१ अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदवले गेले होते़
जम्मू-काश्मिरातही थंडीचा कडाका वाढला आहे़ राजधानी श्रीनगरमध्ये आज ४़७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले़ उत्तर प्रदेशात भीषण थंडीने सर्वांनाच कापरे भरले आहे़ येत्या काही दिवसांत हा कडाका असाच कायम राहण्याची शक्यता आहे़ राज्यात अनेक भागात सकाळी अनेक तास दाट धुक्यांमुळे जनजीवन प्रभावित झाले़ हरदोईच्या कोर्रिया भागात दाट धुक्यात रेल्वे रुळ ओलांडत असताना रेल्वेखाली चिरडून एका ३२ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला़
हरियाणा, पंजाब या राज्यातही थंडीची लाट आहे़ राजस्थानातही थंडीने कहर केला आहे़

Web Title: Uttar Pradesh, which is freezing cold in north India, has a mercury of 2-6 degrees Celsius