शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

लस घेतल्याच्या दुसऱ्या दिवशी वॉर्डबॉयचा मृत्यू, उत्तर प्रदेशातील घटना; प्रकरणाची चौकशी झाली सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 2:23 AM

रविवारी संध्याकाळी त्यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

लखनौ :उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये कोरोना लस घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी एका वॉर्ड बॉयचा मृत्यू झाला आहे. महिपाल (४६) असे त्यांचे नाव आहे. १६ जानेवारी रोजी त्यांनी ही लस घेतली होती. रविवारी संध्याकाळी त्यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. जिल्हा रुग्णालयाच्या सीएमओंनी म्हटले आहे की, या प्रकरणात लसीची रिॲक्शन झाल्याचे दिसून येत नाही. त्यांच्या मृत्यूच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. १५ राज्यात कोरोनाचा एकही मृत्यू नाही देशातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ कोटी २ लाखांवर पोहचली आहे. गत २४ तासात १५ राज्यात कोरोनाचा एकही मृत्यू नाही. १३ राज्यात १ ते ५ मृत्यू आहेत. तर, ४ राज्यात ५ ते १० मृत्यू आहेत. एका राज्यात १० ते २० मृत्यू आहेत.आठ महिन्यांनंतर  सर्वात कमी मृत्यू देशात या महिन्यात दुसऱ्यांदा २४ तासात एक हजारपेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत. देशातील एकूण रुग्णांची संख्या वाढून १ कोटी ५ लाख ७१ हजारांवर पोहोचली आहे. एका दिवसात १४५ रुग्णांचा मृत्यू झाला असून, गत आठ महिन्यांतील ही सर्वांत कमी संख्या आहे. देशात एका दिवसात १३,७८८ नवे रुग्ण आढळले आहेत. यापूर्वी १२ जानेवारी रोजी १२,५४८ रुग्ण आढळले होते.  १४५ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या वाढून १,५२,४१९ झाली आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसDeathमृत्यूUttar Pradeshउत्तर प्रदेशhospitalहॉस्पिटल